"...तर माझ्या मतदानाचा अधिकार संजय राऊतांना देऊन टाका" | Devendra Bhuyar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Bhuyar

"...तर माझ्या मतदानाचा अधिकार संजय राऊतांना देऊन टाका"

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुका २० जूनला होणार आहे. त्यासाठी सर्वचं पक्षांनी आपले मत फुटू नये यासाठी काळजी घेतली जात आहे. विधानपरिषदेच्या १० जागांसाठी मतदान होणार असून महाविकास आघाडीकडून सहा तर भाजपकडून पाच उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान अपक्ष आमदारांना पक्षांकडून संपर्क साधला जात आहे.

शिवसेनेच्या संजय राऊतांनी राज्यसभेच्या निवडणुकीतील घोडेबाजारानंतर गद्दारी केलेल्या आमदारांची यादी जाहीर केली होती. त्यामध्ये अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांचेही नाव होते. त्यामुळे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी "माझ्या मताचा अधिकारच संजय राऊतांना देऊन टाका." असं म्हटलं आहे.

(MLA Devendra Bhuyar On Sanjay Raut)

हेही वाचा: निवडणुकीपूर्वीच CM ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेची बैठक; दिला 'हा' कानमंत्र

"संजय राऊत यांना माझ्यासोबत मतदान करताना पाठवा अशी मागणी मी महाविकास आघाडीच्या बैठकीत करणार आहे. मी त्यांच्यासोबत मतदान करणार आहे. नाहीतर माझा मत करण्याचा अधिकार संजय राऊत यांना देऊन टाका म्हणजे शंका घेण्याचा प्रश्नच राहणार नाही." असं अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी सांगितलं आहे.

दरम्यान "आमचा अपक्ष आमदारांवर पूर्ण विश्वास आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत ते सर्वांचेच आहेत आणि भुयारांवरही आमचा विश्वास आहे." असं राऊत म्हणाले आहेत.

हेही वाचा: मुंबई पुण्यासह 13 शहरात लवकरच 5G सेवा होणार सुरू

राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव झाला होता. तर त्यांच्या विरोधातील भाजपच्या धनंजय महाडिकांचा विजय झाला होता. या पराभवाचे खापर शिवसेनेच्या संज राऊतांनी अपक्ष आमदारांवर फोडलं होतं. आमच्याशी गद्दारी करणाऱ्या आमदारांना आम्ही पाहून घेऊ असंही ते म्हणाले होते. त्यानंतर त्यांनी ६ अपक्ष आमदारांची यादी जाहीर केली होती. त्या यादीत आमदार देवेंद्र भुयार यांचही नाव होतं.

त्यानंतर देवेंद्र भुयार यांनी आपण शिवसेनेला मतदान केल्याचं स्पष्ट केलं होतं. आणि यासंदर्भात त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी त्यांनी सावध पवित्रा घेतला असून आपण शिवसेनेलाच मतदान करणार असल्याचं स्पष्ट केलंय.

हेही वाचा: "...अन् मी त्यांचा दीर झालो"; काय घडलं वसंत मोरेंसोबत?

दरम्यान "आता त्यांना विश्वास नसेल तर त्यांनी मतदान करायला माझ्यासोबत यावं अशी मागणी मी महाविकास आघाडीच्या बैठकीत करणार आहे. नाहीतर माझा मतदान करण्याचा अधिकारच त्यांना देण्यात यावा म्हणजे शंका घेण्याचा प्रश्नच राहणार नाही." असं वक्तव्य अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी केलं आहे.

Web Title: Mla Devendra Bhuyar On Sanjay Raut Vidhanparishad Election

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top