Vidhan Sabha 2019 : काँग्रेसला धक्का; पाचवेळा आमदार राहिलेला नेता करणार भाजपमध्ये प्रवेश

अभिजित घोरमारे
रविवार, 29 सप्टेंबर 2019

महाराष्ट्राच्या राजकारणात गोंदिया जिल्हा हा प्रफुल पटेल यांच्या नावाने ओळखला जात असून काँग्रेस राष्ट्रवादीच्या युतीमध्ये ही जागा काँग्रेच्या वाट्याला आहे. गोपालदास अग्रवाल हे सतत तीनवेळा या मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आलेले आहेत. ते गोपालदास अग्रवाल उद्या (ता.29) भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत.

भंडारा-गोंदिया : महाराष्ट्राच्या राजकारणात गोंदिया जिल्हा हा प्रफुल पटेल यांच्या नावाने ओळखला जात असून काँग्रेस राष्ट्रवादीच्या युतीमध्ये ही जागा काँग्रेच्या वाट्याला आहे. गोपालदास अग्रवाल हे सतत तीनवेळा या मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आलेले आहेत. ते गोपालदास अग्रवाल उद्या (ता.29) भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत.

2014च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी स्वबळावर लढले आणि नरेंद्र मोदी यांची लाट असतानासुद्धा गोपालदास अग्रवाल यांनी विजय मिळवला होता. गोंदिया मतदार संघात दोनदा विधानपरिषद सदस्य व तीनदा आमदार असे एकूण पाचवेळा आमदार राहिलेल्या अग्रवाल यांनी आता काँग्रेस पक्षाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या कार्यकर्त्यांसोबत ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. 

दुसरीकडे भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष विनोद अग्रवाल यांना भाजपने उमेदवारी नाकारल्याने विनोद अग्रवाल अपक्ष निवडणूक लढविणार असल्याने गोंदियात भाजपला धक्का बसणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Gopaldas Agrawal enters in BJP