Sharad Pawar: आमदार जयकुमार गोरे यांच्या अपघातावर शरद पवार म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad pawar

Sharad Pawar: आमदार जयकुमार गोरे यांच्या अपघातावर शरद पवार म्हणाले...

माण येथील भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला अपघात झाला. त्यांच्या अपघातानंतर अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Mla Jaykumar Gore Car Accident Sharad Pawar Reaction maharashtra politics )

पुणे पंढरपूर रस्त्यावर फलटणजवळील मलठण स्मशानभूमीजवळ शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. यानंतर आता आमदार गोरे यांच्यावर पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा: Jitendra Awhad: CM शिंदेंविरोधात अपशब्द वापरल्यामुळं NCP नेत्याला होणार अटक, आव्हाडांना आधीच कळली बातमी!

काय म्हणाले शरद पवार?

“रात्री-अपरात्री प्रवास करणं टाळायला पाहिजे. पण मी स्वतः कधी त्याचं पालन करत नाही, याबद्दल घरातील नेहमी मला बोलतात. परंतु राजकीय जीवनात काम करताना लोकांशी अधिकाधिक संपर्क ठेवण्याचा मोह टाळला जात नाही. मात्र सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने काळजी घ्यावी. असे आवाहन शरद पवार यांनी यावेळी केले.

हेही वाचा: Tunisha Sharma : तुनिशाला आत्महत्येस प्रवृत्त करायला लावणारा शीजान खान आहे तरी कोण?

अपघातानंतर जयकुमार गोरे यांच्या वडिलांनी घातपाताचा संशय व्यक्त केलाय. मात्र, शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. कदाचित बोलण्याच्या ओघात किंवा अनावधानानं त्यांच्या चालकाकडून चूक घडली असेल पण असं काहीही नाही. ते स्वतः झोपेत असतानाच हा अपघात घडला, पण आता त्यांची प्रकृती उत्तम आहे, अशा शब्दांत शंभुराज देसाई यांनी गोरेंच्या प्रकृतीची माहिती दिली.

टॅग्स :Sharad PawarNCP