आमदार नारायण पाटील यांच्यावर गुन्हा दाखल 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 एप्रिल 2017

करमाळा - शेटफळ (ता. करमाळा) येथील रोहिदास कांबळे यांना मोबाईलवरून दमबाजी केल्याबद्दल आमदार नारायण पाटील यांच्यावर सोमवारी (ता. 3) करमाळा पोलिसांत अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी कांबळे (वय 55, रा. शेटफळ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे, की माझ्या शेतातील पाइपलाइन फोडल्याबाबत संबंधितांविरुद्ध करमाळा पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर आमदार पाटील यांनी फोनवरून दमबाजी केली. कांबळे हा परिसरातील शेतकऱ्यांना विनाकारण वारंवार त्रास देतो. ऍट्रॉसिटीच्या खोट्या तक्रारी करून, प्रकरण मिटविण्यासाठी तो "ब्लॅकमेलिं'ग करतो.

करमाळा - शेटफळ (ता. करमाळा) येथील रोहिदास कांबळे यांना मोबाईलवरून दमबाजी केल्याबद्दल आमदार नारायण पाटील यांच्यावर सोमवारी (ता. 3) करमाळा पोलिसांत अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी कांबळे (वय 55, रा. शेटफळ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे, की माझ्या शेतातील पाइपलाइन फोडल्याबाबत संबंधितांविरुद्ध करमाळा पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर आमदार पाटील यांनी फोनवरून दमबाजी केली. कांबळे हा परिसरातील शेतकऱ्यांना विनाकारण वारंवार त्रास देतो. ऍट्रॉसिटीच्या खोट्या तक्रारी करून, प्रकरण मिटविण्यासाठी तो "ब्लॅकमेलिं'ग करतो. अशा अनेकांच्या तक्रारी आल्यामुळे आपण त्याला समजाविण्याचा प्रयत्न केला. त्याला कुठल्याही प्रकारची धमकी दिली नाही, असे आमदार पाटील यांनी सांगितले. 

Web Title: MLA Narayan Patil criminal case