रस्त्यात बंद पडलेल्या लाल परीला आमदार लंकेंनी दिला धक्का; व्हिडीओ व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nilesh Lanke

रस्त्यात बंद पडलेल्या लाल परीला आमदार लंकेंनी दिला धक्का; व्हिडीओ व्हायरल

नगर : जनमानसाप्रती तळमळ असलेला कार्यकर्ता ते लोकनेता अशी ओळख असलेल्या पारनेर विधानसभा क्षेत्राचे आमदार निलेश लंके (MLA Nilesh Lanke) यांनी काही दिवसांपूर्वीच नाशिक पुणे महामार्गावर झालेल्या अपघातातील (Accident) दुचाकीस्वारास स्वतःच्या वाहनातून रुग्णालयात नेत त्याचे प्राण वाचवले होते. आता निलेश लंके यांचा आणखी व्हिडीओ समोर आला असून त्यात ते लाल परीला धक्का देताना दिसत आहेत. (Nilesh Lanke news in Marathi)

श्रीगोंदा-नगर ही बंस रस्त्यात बंद पडली होती. बसला धक्का देऊन सुरू करण्याची आवश्यकता होती. यावेळी आमदार लंके यांनी बसला धक्का देण्यास मदत केली. मात्र तरी देखील बस सुरू होऊ शकली नाही. यावेळी इतर लोकही आमदार लंके यांच्यासोबत धक्का मारताना दिसत आहेत.

दरम्यान धक्का देऊनही बस सुरू न झाल्याने अखेर आमदार लंके यांनी आपल्या हातात बसचे स्टेरींग घेतले. एवढच नव्हे तर बस सुरू करून दिली. आमदार लंकेचा बसला धक्का देतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ते बस सुरू करताना देखील दिसत आहे.

टॅग्स :AhmednagarNCPNilesh lanke