
डोंबिवली जिमखान्याला स्टेडियम साठी 25 कोटींच्या निधीची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी केली. जिमखान्याचा आजीवन सदस्य या नात्याने मनसे आमदार राजू पाटील यांनी शिंदे यांचे ट्विटरवर मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.
त्यासोबतच आमदार पाटील यांनी कोणताही दुजाभाव न करता आपण माझी ही मागणी मान्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करत कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात आरक्षीत भूखंड तसेच गुरचरण जागा अजूनही शिल्लक आहेत. अश्या भूखंडांवर / गुरचरणींवर उदयोन्मुख खेळाडूंसाठी प्रशस्त स्टेडियम साठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी जाहीर विनंती व मागणी पाटील यांनी केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी डोंबिवली जिमखाना येथे भेट दिली. यावेळी त्यांनी स्टेडियम साठी 25 कोटींच्या निधीची घोषणा केली. यावर कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी त्यांचे जिमखाना सदस्य या नात्याने आभार मानले आहेत.
तसेच तातडीने एक मागणी करत कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात आरक्षीत भूखंड तसेच गुरचरण जागा अजूनही शिल्लक आहेत. अश्या भूखंडांवर / गुरचरणींवर उदयोन्मुख खेळाडूंसाठी प्रशस्त स्टेडियम साठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी जाहीर विनंती व मागणी पाटील यांनी ट्विटरद्वारे केली आहे.
ते पुढे म्हणाले की, डोंबिवली जिमखान्याने कोविड काळात कोणतेही भाडे न आकारता कोविड सेंटरसाठी मोफत जागा दिली होती. परंतु कोविड संपल्यानंतर अनेक विनवण्या करूनही मनपाने एकप्रकारे कृतघ्नता दाखवत जागा रिकामी करून दिली नव्हती,
त्याचा प्रचंड मनस्ताप सर्वच जिमखाना सदस्यांना व खेळाडूंना झाला होता. परंतु त्यातूनही मुख्यमंत्री शिंदे यांनी कोट्यवधी रुपयांच्या भरघोस निधीची घोषणा करून एकप्रकारे या जखमेवर फुंकर घालण्याचे काम केले आहे त्याबद्दलही आभार मानले.
त्या निमित्ताने पाटील यांनी शिंदे यांना विनंती केली की, ग्रामीण भागात कित्येक मुलं-मुली क्रिकेट,कब्बड्डी,कुस्ती,शुटींग, फुटबॉल अश्या विविध खेळ प्रकारात आपले नैपुण्य दाखवत आहेत.
एकीकडे सरकारने आमच्या हक्काच्या गुरचरण जमिनी मेट्रो कारशेड,डंपिंग, ग्राऊंड, ग्रोथ सेंटर, म्हाडा व इतर बिल्डरांच्या घश्यात घातल्याच आहेत, मात्र उरलेल्या जागांवर विचार करून त्या जमिनी वाचवा असे म्हंटले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.