काहीही बरळणाऱ्यांना राजाश्रय आणि पुरस्कार मिळतो; माजी मुख्यमंत्र्यांचा गोखलेंना टोला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prithviraj Chavan

मराठी अभिनेते विक्रम गोखले (Marathi Actor Vikram Gokhale) यांनी कंगनाच्या विधानाचं समर्थन केलंय.

काहीही बरळणाऱ्यांना राजाश्रय आणि पुरस्कार मिळतो : पृथ्वीराज चव्हाण

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

सातारा : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत (Bollywood Actress Kangana Ranaut) नेहमीच तिच्या बेधडक व्यक्तव्यांसाठी सोशल मीडियावर चर्चेत असते. कंगना बोलताना कसलाही विचार करत नाही. नुकताच कंगनाचा पद्मश्री पुरस्कार (Padma Shri Award) देऊन सन्मान करण्यात आला. मात्र, त्यानंतर दिलेल्या मुलाखतीत कंगनानं केलेल्या वक्तव्यानं सोशल मीडियावर रान पेटलंय. देशाला खरं स्वातंत्र्य २०१४ साली मिळल्याचं कंगनानं म्हटलंय. कंगनानं केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यावरून तिच्यावर टीका होऊ लागलीय.

याच दरम्यान मराठी अभिनेते विक्रम गोखले (Marathi Actor Vikram Gokhale) यांनी कंगनाच्या विधानाचं समर्थन केलंय. मात्र, त्यांच्या विधानाचा काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी चांगलाच समाचार घेतला असून काहीही बरळणाऱ्यांना राजाश्रय आणि पुरस्कार मिळतो. विक्रम गोखलेंना वाटत असेल, तर त्यांनी राजकीय पक्षात सामोरं व्हावं, असा टोला चव्हाण यांनी कंगना आणि गोखलेंना लगावलाय.

हेही वाचा: आमदार शिंदे-रांजणे यांच्यात 'हाय होल्टेज' लढत

कंगनानंतर आता ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेही वादात अडकण्याची शक्यता आहे. कारण, काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कंगना राणावतनं केलेल्या स्वातंत्र्याबद्दलच्या वक्तव्याचं गोखलेंनी समर्थन केलंय. 1947 साली देशाला मिळालेलं स्वातंत्र्य म्हणजे भीक होती, असं कंगना म्हणाली होती. त्यानंतर देशात मोठा वाद निर्माण झाला होता. कंगनाच्या त्याच वक्तव्याचं विक्रम गोखले यांनी समर्थन केलंय. 75 व्या वाढदिवसानिमित्त ब्राह्मण महासंघाच्या वतीनं ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना गोखलेंनी हे विधान केलंय. मराठी अभिनेते विक्रम गोखले यांनी अभिनेत्री कंगना राणावत हिने केलेल्या वक्तव्याबाबत आपलं मत मांडलं. गोखले यांनी केलेल्या वक्तव्याबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी टोला लगावलाय. चव्हाण म्हणाले, गोखले यांनी राजकारणावर बोलण्यापेक्षा एखाद्या पक्षात जावं. त्यातून निवडणूक लढवावी, मते मिळवावीत आणि त्यातून स्वत: मुख्यमंत्री बनावं, तसेच पंतप्रधान झाल्यास त्याचा मला आनंदच असेल, असा खोचक टोला चव्हाणांनी गोखलेंना लगावला.

हेही वाचा: 'शिवशाहीर बाबासाहेबांची 'ही' इच्छा आता सरकारनच पूर्ण करावी'

काय म्हणाले विक्रम गोखले?

कंगनाच्या वक्तव्याचं समर्थन करताना विक्रम गोखलेंनी म्हटलंय, कंगना राणावत जे म्हणाली आहे, ते खरं आहे. ते स्वातंत्र्य भीक मागूनच मिळालेलं आहे. यावर मी सहमत आहे. हे दिलं गेलेलं आहे बरं का? ज्या योद्ध्यांनी स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न केला, त्यांना फाशी देताना मोठे लोक बघत राहिले. त्यांना वाचवलं नाही. आपले लोक ब्रिटिशांविरोधात उभे आहेत हे पाहूनसुद्धा वाचवलं नाही. मतपेट्यांचं राजकारण करणाऱ्यांमुळेच हिंदू, मुस्लिम, ब्राह्मण, दलित असा वाद होत आहे. भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र आल्यास फार बरं होईल, असंही ते म्हणाले.

हेही वाचा: जगातील सर्वात धोकादायक विंचवांचा नागरिकांवर हल्ला; 3 ठार, 500 जखमी

काय म्हणाली होती कंगना?

आपल्या वक्तव्यानं नेहमीच चर्चेत असणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतनं पुन्हा एकदा वाद निर्माण केलाय. एका मुलाखतीत कंगनानं देशाच्या स्वतंत्र्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलंय. या वक्तव्यावरुन आता कंगनावर विविध क्षेत्रातून टीका होऊ लागलीय. खासगी चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत एका प्रश्नाला उत्तर देताना कंगनानं 1947 साली मिळालेलं स्वतंत्र्य भिक होतं, देशाला खरं स्वतंत्र्य 2014 मध्ये मिळालं, असं वक्तव्य केलंय.

loading image
go to top