Scorpion Attack | विंचू चावला... 3 ठार, 500 जखमी! वादळामुळे विंचवांची दहशत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Scorpion

विंचू चावल्यानंतर 89 लोकांना अस्वान विद्यापीठातील (Aswan University) रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

विंचू चावला... 3 ठार, 500 जखमी! वादळामुळे विंचवांची दहशत

काहिरा : इजिप्तच्या दक्षिणेकडील (Egypt South) भागात असलेल्या अस्वान शहरात जोरदार वादळानंतर विंचवाची (Scorpion) फौज बाहेर आलीय आणि त्यांनी स्थानिक लोकांवर हल्ला करायला सुरुवात केलाय. या भीषण हल्ल्यात आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झालाय, तर 500 जण जखमी झाले आहेत. या विंचवांनी राज्यपाल कार्यालयाजवळील डोंगराळ भागातही हल्ले चढवले आहेत. या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांच्या सुट्याही रद्द करण्यात आल्या आहेत.

इजिप्तमधील आरोग्य मंत्रालयाच्या प्रतिनिधीनं सांगितलं, की विंचू चावल्यानंतर 89 लोकांना अस्वान विद्यापीठातील (Aswan University) रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. एवढंच नाही, तर शहरातील इतर रुग्णालयातही शेकडो लोकांवर उपचार सुरू आहेत. रुग्णांची मोठी संख्या पाहता, रजेवर गेलेल्या डॉक्टरांना परत बोलावण्यात आलं असून सर्व रुग्णालयांना विंचूविरोधी ओषध पुरवलं जात आहे.

हेही वाचा: किम जोंग उनची तब्येत खालावली! हुकूमशहा एका महिन्यापासून 'बेपत्ता'

शुक्रवारी, अस्वानचे गव्हर्नर अशरफ अत्तिया यांनी नाईल नदीवरून येणाऱ्या जहाजांना शहराभोवती येण्यापासून रोखलंय. विंचू चावल्यामुळं लोकांची दृष्टीही धूसर झालीय, त्यामुळं शहरातील काही भागात वाहतूकही ठप्प झालीय. मात्र, शनिवारी रस्ता आणि जहाज वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आलीय. स्थानिकांना त्यांच्या घरापासून आणि झाडांनी भरलेल्या भागापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आलाय.

हेही वाचा: इजिप्त : राजा फराओच्या भव्य मंदिराचे जुने अवशेष सापडले

तर, दुसरीकडे मुसळधार पाऊस, वादळ आणि बर्फवृष्टीमुळं या भागात पुराची शक्यताही बळावलीय. इजिप्शियन विंचू जगातील सर्वात धोकादायक मानले जातात. या विंचवाची शेपूट जाड आणि काळ्या रंगाची असते आणि त्यांचा डंक जीवघेणा असतो. विंचवाचा डंख मारल्यानंतर, तासाभरात उपचार न झाल्यास रुग्णाचा वेदनेने मृत्यू होतो, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. त्याच्या चाव्यानं श्वासही गुदमरतो, असंही त्यांनी सांगितलं.

loading image
go to top