'जिसने कुछ गलत किया नहीं, उसे किसी का..'; राम कदमांचा राऊतांवर निशाणा

Sanjay Raut vs Ram Kadam
Sanjay Raut vs Ram Kadamesakal
Summary

माजी रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांच्यासारखं तुरुंगात जावं लागेल, अशी धमकीच दिल्याचा दावा खासदारांनी केलाय.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आता नवा खुलासा केलाय. राऊतांनी राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu) यांना पत्र लिहून धक्कादायक आरोप केले आहेत. संजय राऊतांच्या खळबळजनक पत्रानंतर आता भाजपकडून देखील प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी ट्विट करत राऊतांवर जोरदार टीका केलीय.

राम कदम यांनी ट्विटमध्ये लिहिलंय, 'जिसने कुछ गलत किया नहीं, उसे किसी का डर नहीं सताता! राजेश खन्ना (Rajesh Khanna) के अंदाज में.. ये पब्लिक है, सब जानती है! असं म्हणत त्यांनी शेवटी सत्य मेव जयते, असा उल्लेख करुन राऊतांवर निशाणा साधलाय. भाजपा नेते अतुल भातखळकरांनी (Atul Bhatkhalkar) देखील राऊतांच्या त्या पत्राला चांगलाच प्रत्युत्तर दिलंय.

Sanjay Raut vs Ram Kadam
निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; पाच आमदार MDA मध्ये सामील

संजय राऊत यांनी पत्रात म्हंटलंय, एक महिन्यापूर्वी मला काही लोक भेटले. त्यांनी राज्यातील महविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) पाडण्यात मदत करण्याचं सांगितलं. असं न केल्यास कारवाई होईल, अशा इशारा दिल्याचा खुलासा राऊतांनी केलाय. माजी रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्यासारखं तुरुंगात जावं लागेल, अशी धमकीच दिल्याचा दावाही खासदारांनी केलाय. तसेच राज्यातील कॅबिनेटमधील दोन मंत्री आणि दोन मोठ्या नेत्यांना अटक होणार असल्याचे सुतोवाच केले आहे. या घटनांमुळं राज्यात मध्यावधी निवडणूक लागणार, असं भाकीत वर्तवलं होतं. ईडीचा राजकीय वापर होत असल्याचं खबळजनक पत्र संजय राऊत ट्वीट केलंय. इतरही अनेक खुलासेही राऊतांनी उपराष्ट्रपतींना दिलेल्या पत्रात केले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com