'मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालिसा वाचावी, अन्यथा...' : रवी राणा

Ravi Rana Warned CM Uddhav Thackeray
Ravi Rana Warned CM Uddhav Thackeraye sakal

मुंबई : आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (CM Uddhav Thackeray) हनुमान चालिसा वाचण्याचं आव्हान दिलंय. मुख्यमंत्र्यांनी उद्या मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचावी. मुख्यमंत्र्यांनी उद्या हनुमान चालिसेचं पठण केलं नाहीतर आम्ही स्वतः मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा वाचणार असल्याचा इशारा रवी राणा यांनी दिला आहे.

Ravi Rana Warned CM Uddhav Thackeray
राज ठाकरे पुण्यात दाखल; उद्या महाआरती अन् हनुमान चालिसाचे पठन

राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मातोश्रीवर हनुमान चालिसेचं पठण करावं. उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचे विचार आणि दिशा विसरले असतील तर आम्ही खासदार आणि आमदार मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करू आणि बाळासाहेबांचे विचार जागृत करू, असं रवी राणा म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या घरी हनुमान चालिसेचं पठण व्हायलाच पाहिजे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांच्या घरी हनुमान चालिसा पठण होत नसेल तर ते चुकीचे आहे. उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे विचार विसरले आहेत. ते दुसऱ्या दिशेने भरकटले आहेत आणि त्यांनी बाळासाहेबांच्या विचारावर चालून राज्याला दिशा द्यावी, असं रवी राणा म्हणाले.

रवी राणांवर सेनेचा पलटवार -

आमदार रवी राणांच्या आव्हानानंतर शिवसेनेकडून (Shivsena) देखील प्रतिक्रिया देण्यात आली आहे. फुकटे सल्ले आणि फुकटचे इशारे आम्ही ऐकत नाही. काय करायचं आहे ते आपआपल्या मंदिरात करा. दुसऱ्याचे बाप हायजॅक करण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या कुठल्या बापांचा तुमच्यावर आश्रय आहे तो दिसतोय. अतिशहाणपणा वाढत चालला आहे. थेट मुख्यमंत्र्यांना टार्गेट करू नका. आम्ही शिवसैनिक अजून मेलेलो नाही. आम्ही आईचं दुध पिऊन आलो आहे. तुम्ही फक्त येऊन दाखवा, मग दाखवते शिवसैनिक काय आहे? तुम्ही मातोश्रीवर येऊन तर दाखवा, असं खुलं आव्हान मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलं. त्या एबीपी माझासोबत बोलले होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com