ठाकरेंवरील ते ट्वीट म्हणजे टेक्निकल प्रॉब्लेम, संजय शिरसाटांचे स्पष्टीकरण

mla sanjay shirsat commented on tweet shivsena uddhav thackeray maharashtra cabinet crises eknath shinde
mla sanjay shirsat commented on tweet shivsena uddhav thackeray maharashtra cabinet crises eknath shinde

मुंबई : एकानाथ शिंदे यांनी बंडखोरी करून भाजपसोबत एकत्र येत राज्यात सत्ता स्थापन केलेल्या शिंदे गटात मंत्रीपदावरून नाराजी नाट्य सुरु झाल्याचं चित्र आहे. कारण शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी शुक्रवारी रात्री उद्धव ठाकरेंचा एक जुना व्हिडिओ ट्वीट केला आहे. यामध्ये 'उद्धव ठाकरे' यांचा महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख असा उल्लेख करण्यात आला होता. या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात शिरसाट पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे वळत असल्याची चर्चा सुरु झाली, दरम्यान संजय शिरसाट यांनी स्वतः माध्यमासमोर येत त्या ट्वीटबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे.

काल केलेल्या ट्वीटबद्दल बोलताना औरंगाबादचे आमदार शिरसाट म्हणाले की, मी भावनेच्या भरात मी म्हणून गेलो की उद्धव ठाकरे कुटुंबप्रमुख होते, मी सांगू इच्छीतो की हा सगळा माझ्या मोबाईलचा टेक्निकल प्रॉब्लेम आहे. मागची पोस्ट आपोआप कशी फॉरवर्ड झाली ते मला सांगता येणार नाही. आम्ही सर्व जण उद्धव ठाकरेंना सतत सांगत होतो की तुम्ही पक्ष प्रमुख म्हणून राहा, सत्ता ही इतरांच्या हातात द्या. ठरल्याप्रमाणे जर शिंदे तेव्हा मुख्यमंत्री झाले अशते आणि उद्धव ठाकरे पक्षप्रमुख राहिले असते तर शिवसेना पक्ष आणखी वाढीस लागला असता असे शिरसाट यावेळी म्हणाले.

तांत्रिक अडचण झाल्यानं ती पोस्ट फॉरवर्ड झाली, या क्षणाला तरी मी त्याचं समर्थन करत नाही, मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. यामध्ये चूकीचा संदेश जाऊ नये म्हणून मी स्पष्टीकरण देत आहे असे शिरसाट म्हणाले. मी कधीही दबावतंत्र वापरलं नाही. हा दबावतंत्राचा भाग नाही असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

mla sanjay shirsat commented on tweet shivsena uddhav thackeray maharashtra cabinet crises eknath shinde
Sanjay Shirsat : शिरसाटांकडून ठाकरेंचा जुना व्हिडिओ ट्विट; शिंदे गटात नाराजी?

मंत्रिमडळ विस्ताराच्यानावं कमी जास्त होत असताना राग येणं, संतापाच्या गोष्टी होतात. यावेळी सगळ्यांसोबत चर्चा झाल्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगळ्यांशी चर्चा करुन निर्णय घेतला म्हणून या गोष्टीला उठावाशी संबंध नाही असे शिरसाट म्हणाले. राजकारणात पुढं जावं वाटणं साहाजिक आहे, आणि त्याची नाराजी चेहऱ्यावर दिसण देखील स्वाभाविक असल्याचे देखील ते म्हणाले. मी नाराज होतो, त्यांनी पुढच्या वेळी पाहू, असं सांगितलं असल्याचे शिरसाट म्हणाले.

mla sanjay shirsat commented on tweet shivsena uddhav thackeray maharashtra cabinet crises eknath shinde
Jayant Patil : शिंदे गटाची ताकद खूप मोठी; नव्या सेनाभवनावर NCP ची प्रतिक्रिया

शिरसाट काय म्हणाले..

शिरसाट यांनी केलेल्या ट्वीटमध्ये त्यांनी 'उद्धव ठाकरे' यांचा महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख असा उल्लेख करण्यात आला होता. एवढेच नव्हे तर, शिरसाट यांनी टि्वट सोबत विधानसभेतील उद्धव ठाकरेंचे एक भाषण देखील जोडलं होते. मात्र, काही वेळाने त्यांनी हे ट्वीट डिलिट केले. शिंदेच्या बंडानंतर शिरसाठ शिंदे गटात सर्वात पहिले सहभागी झाले होते असे असतानाही त्यांना नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांच्या या व्हिडिओनंतर त्यांनी एकनाथ शिंदेंना इशारा तर दिला नाही ना? अशी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, काही वेळातच शिरसाट यांनी हे ट्वीट डिलीट देखील केले आहे. जुन्या व्हिडिओचे ट्वीट डिलिट केल्यानंतर शिरसाटांनी आणखी एक ट्वीट करत काही गोष्टी नमुद केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com