
आम्हाला गद्दार म्हणणाऱ्याच्या कानाखाली जाळ काढणार - आमदार बांगर
मुंबई : जे कोणी आपल्याला गद्दार म्हणत आहेत त्यांच्या कानाखाली जाळ काढा असा इशारा शिंदे गटात गेलेले आमदार संतोष बांगर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे. आम्ही आरे म्हणणाऱ्याला कारे नाही तर त्याच्या कानाखाली जाळ काढणार आहोत. आम्ही बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आहोत असंही ते यावेळी म्हणाले आहेत.
(MLA Santosh Bangar News)
दरम्यान संतोष बांगर हे शिंदे गटात गेलेले शेवटचे आमदार आहेत. सरकारच्या बहुमत चाचणीनंतर त्यांनी मुंबईत आपल्या कार्यकर्त्यांसहित शक्तिप्रदर्शन केलं होतं. पण परत ते आपल्या हिंगोली या मतदारसंघात गेल्यावर शिवसैनिकांकडून त्यांच्याविरोधात निदर्शने करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या तोंडातून हिंसेची भाषा येऊ लागली आहे.
हेही वाचा: शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय घटनाबाह्य? वाचा तज्ज्ञांचे मत
दरम्यान त्यांच्याकडील शिवसेना जिल्हाप्रमुख पद काढून घेण्यात आलं होतं. यासंबंधी सामनामध्ये बातमी छापून आली होती. त्यानंतर शिवसेना आमचीच आहे. कुणी मला जिल्हाप्रमुख पदावरून काढू शकत नाही असा इशाराही त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिला होता.
आपण शिवसैनिक आहोत आपण हातात बांगड्या भरल्या नाहीत. त्यामुळे जे कुणी आपल्याला गद्दार म्हणत असेल तर त्यांच्या कानाखाली जाळ काढा अशी चिथावणी बांगर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिली आहे. त्यामुळे त्यांच्या अशा बोलण्याची चर्चा होऊ लागली आहे.
Web Title: Mla Santosh Bangar Sh Ivsena Eknath Shinde Uddhav Thackeray
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..