मोदी सरकारकडून शेतकऱ्यांवर अन्याय; राष्ट्रवादीच्या आमदाराची टीका

Narendra Modi vs Shashikant Shinde
Narendra Modi vs Shashikant Shindeesakal
Summary

'रणसिंगवाडीने प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाची पाठराखण करून मताधिक्य दिले आहे.'

विसापूर (सातारा) : केंद्रातील नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारकडून (Modi Government) यंदाच्या अर्थसंकल्पीय (Budget) अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करून दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, याउलट शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या रासायनिक खतांच्या किमतीत वाढ करून मोदी सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे, अशी टीका माजी पालकमंत्री आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी केली.

रणसिंगवाडी (ता. खटाव) येथे विविध विकासकामांच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी सातारा जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रदीप विधाते, ज्येष्ठ नेते बाळासाहेब इंगळे, जिल्हा नियोजन समिती सदस्य सागर साळुंखे, बाजार समितीचे संचालक राजेंद्र कचरे, ज्येष्ठ नेते जोतीनाना सावंत, पंचायत समिती सदस्य संतोष साळुंखे, माजी सरपंच तुकाराम यादव, युवराज बिटले, ज्ञानेश्वर जगताप, सरपंच सुखदेव रणसिंग, उपसरपंच विठ्ठल मसुगडे, श्रीरंग फडतरे, विठ्ठल फडतरे, बाजीराव जाधव, विश्वास शिंदे, सुनील फडतरे, लक्ष्मण जाधव, सुरेश मसुगडे, नाना मसुगडे, सुनील पोतेकर, सुनील रणसिंग व ग्रामस्थ उपस्थित होते.

Narendra Modi vs Shashikant Shinde
Political News : अवघ्या 40 दिवसांत दुसऱ्यांदा भाजपात प्रवेश

आमदार शिंदे म्हणाले, ‘‘रणसिंगवाडीने प्रत्येक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पक्षाची (NCP) पाठराखण करून मताधिक्य दिले आहे. रणसिंगवाडी-बुध मुख्य रस्ता डांबरीकरण ४२ लाख, साकव पूल ३० लाख, अंतर्गत रस्त्यासाठी दहा लाख यांसह विविध विकासकामांना लाखोंचा निधी प्रत्यक्षात उपलब्ध करून दिला आहे. रणसिंगवाडी व वेटणे गावातून जिहे-कटापूर योजनेच्या (Jihe-Katapur Scheme) अंतर्गत आंधळी बोगदा गेलेला आहे. या दोन्ही गावांना या योजनेचे पाणी देण्यासंबंधी सर्व्हे करण्याकरता जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी १६ लाख मंजूर केले आहेत. या दोन्ही गावांना जिहे-कटापूरचे पाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.’’ यावेळी श्री. विधाते, श्री. साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले. सरपंच सुखदेव रणसिंग यांनी प्रास्ताविक केले. बापूराव बागल यांनी सूत्रसंचालन केले. सुभाष शिंदे यांनी आभार मानले.

Narendra Modi vs Shashikant Shinde
'हिंदू राष्ट्र झाल्यास घरच्या घरी हत्यारं बनवणार'; Jitendra Awhad म्हणाले..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com