Vidya Chavan: "देवेंद्र फडणवीसांकडून गृहखात्याचा दुरुपयोग केला जातोय" | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadanvis

Vidya Chavan: "देवेंद्र फडणवीसांकडून गृहखात्याचा दुरुपयोग केला जातोय"

हर हर महादेव चित्रपटाच्या वादानंतर आता पुन्हा एकदा आमदार जितेंद्र आव्हाड एका नव्या वादात अडकले आहेत. काल (रविवारी) रोजी कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या कळवा-खाडी पुलाचे उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान एका महिलेने आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विनयभंग केल्याचा आरोप केला आहे.

त्यानंतर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतोय, असं ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केलं. पोलिसांनी 72 तासांत माझ्याविरोधात दोन खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोपही या ट्वीटमधून आव्हाड यांनी केला. तसेच, लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही, असंही आव्हाड यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान यासंदर्भात प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीच्या नेत्या विद्याताई चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीसांकडून गृहखात्याचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप केला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत जे काही दोन दिवसांत झालं आहे ते भयंकर आहे. मी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आहे. देवेंद्र फडणवीसांकडून गृहखात्याचा दुरुपयोग करण्यात येत आहे. पोलिसांवर दबाव निर्माण केला जात आहे. यांना वाटतील ते गुन्हे लावण्यात येत आहेत. मी मुख्यमंत्र्याना पत्रात सांगितलं आहे की, गृहखात तुमच्याकडे घ्या, देवेंद्र फडणवीसांकडून गृहखात्याचा दुरुपयोग होत आहे असंही विद्याताई चव्हाण बोलताना म्हणाल्या आहे.

हेही वाचा: Jitendra Awhad: 'मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतोय'; आव्हाडांच्या ट्वीटमुळे खळबळ

जर तुम्ही पोलिसांनावर दबाव आणत असाल तर पोलिस खात वेगळं कशाला हवं आहे. कोणता गुन्हा आहे ते पोलिस ठरवली दुसऱ्यांनी यामध्ये पडायला नको हा पोलिसांचा अधिकार आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीसांकडून गृहखात्याचा दुरुपयोग होतो आहे आणि याकडे आपण गंभीरपणे पाहायला हवं असंही त्या म्हणाल्या आहेत.

हेही वाचा: Jitendra Awhad: आव्हाड पुन्हा अडचणीत, महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आठवडाभरात दुसरा गुन्हा दाखल