भाजपचे 'ऑपरेशन कमळ' महाराष्ट्रात फेल, कारण...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 7 November 2019

स्वबळावर सरकार स्थापन करण्यासाठी 145 चा जादूई आकडा नसल्यामुळे भाजपला इतर पक्षांची साथ घ्यावीच लागणार आहे. ही वस्तुस्थिती असताना भाजपचाच मुख्यमंत्री होणार यासाठी जंगजंग पछाडणाऱ्या भाजपला शिवसेनेच्या नाकदुऱ्या काढताना 14 दिवसाचा कालावधी उलटला आहे.

मुंबई : कर्नाटकमधील कुमारस्वामी सरकार पाडण्यात भाजपकडून 'ऑपरेशन लोटस' पार पाडण्यात आले. त्यात सहभागी झालेल्या 17 आमदारांचे राजकीय भवितव्य आजही टांगणीला आहे. हे उदाहरण समोर असल्याने काँग्रेस ,राष्ट्रवादीसह शिवसेनेचा कोणताच आमदार फुटण्याची हालचाल करणार नसल्याचे मानले जाते.

मुनगंटीवार म्हणतात,शिवसैनिकच होणार मुख्यमंत्री

स्वबळावर सरकार स्थापन करण्यासाठी 145 चा जादूई आकडा नसल्यामुळे भाजपला इतर पक्षांची साथ घ्यावीच लागणार आहे. ही वस्तुस्थिती असताना भाजपचाच मुख्यमंत्री होणार यासाठी जंगजंग पछाडणाऱ्या भाजपला शिवसेनेच्या नाकदुऱ्या काढताना 14 दिवसाचा कालावधी उलटला आहे. तरीही अद्याप राजकीय अनिश्चितता असून शिवसेनेने सत्ता सहभागाबाबत कोणताही ग्रीन सिग्नल दिला नसल्याचे समोर येत आहे.

भाजपचं ठरलं! शिवसेनेशिवाय करणार सत्तास्थापनेचा दावा 

या दरम्यान भाजपने अपक्ष आमदारांपासून ते काँग्रेस ,राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या देखील आमदारांना गळ टाकण्याचा प्रयत्न चालवला असल्याचे सांगितले जाते. काही दिवसांपूर्वी कर्नाटकातील मुख्यमंत्री कुमारस्वामी सरकार पाडताना 'ऑपरेशन लोटस' पार पाडले होते. याच धर्तीवर महाराष्ट्रात देखील अशी मोहीम फत्ते करता येते का याची चाचपणी भाजपने केली. मात्र, त्यात यश आले नाही. याला कर्नाटकमधील ऑपरेशन लोटसच कारणुभूत ठरले आहे. कारण कर्नाटकातील जे 17 आमदार फूटले होते त्या सर्वांना तत्कालिन विधानसभा अध्यक्षांनी बडतर्फ करून त्यांच्यावर निवडणूक लढवण्यास बंदी घातली आहे. पक्षांतर बंदी कायदा मोडला असल्याने त्यांना पोटनिवडणुकीला लढता आले नाही. या बाबतचा खटला सर्वोच्च न्यायालयात आहे. हे ताजे उदहरण डोळ्यासमोर असताना शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षांचे आमदार भाजपच्या गळाला लागणे अशक्य असल्याचे मानले जाते. त्यातच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे की कोणत्याही पक्षाचा आमदार फुटला तर त्याच्या विरोधात सर्वपक्षीय आमदार देणार. त्यामुळे नुतन आमदारांना गळाला लावणे सोपे नसल्याचे सांगितले जाते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLAs from Congress, Shivsena and NCP are scared to supports BJP because of Operation Lotus result