Eknath Shinde Group: शिंदे गटातील आमदार नाराज? गुवाहाटी दौऱ्याला जाणार नसल्याने चर्चांना उधाण

गुवाहाटीमधील प्रसिद्ध कामाख्या देवीच्या दर्शनासाठी हे सगळे याठिकाणी जात आहेत
Eknath Shinde Group
Eknath Shinde GroupEsakal

राज्याच्या राजकारणात काही महिन्यांपूर्वी अनेक घडामोडी घडल्या. राज्यात सत्तांतर झालं आणि त्याचं मुख्य केंद्रस्थान राहिलं ते म्हणजे गुवाहाटी. सत्तांतराच्या केंद्रस्थानी राहिलेल्या या गुवाहाटीचं स्थान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार यांच्यासाठी वेगळंच आहे. दरम्यान राज्यात सत्तांतर व्हावं झाल्यानंतर पुन्हा एकदा एकनाथ शिंदे (बाळासाहेबांची शिवसेना) पक्षाचे आमदार आणि खासदार कुटुंबासह आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गुवाहाटीला जाणार आहेत. गुवाहाटीमधील प्रसिद्ध कामाख्या देवीच्या दर्शनासाठी हे सगळे याठिकाणी जात आहेत. दरम्यान काही आमदार आणि मंत्री या दौऱ्याला गैरहजर राहणार आहेत. त्यामुळे शिंदे गटातील आमदार आणि मंत्री नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गुवाहाटी दौर्याला काही आमदार व मंत्री जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे गटातील काही आमदारांनी वैयक्तिक कारणांमुळे जाणार नसल्याच्या तर मंत्री व्यस्त कार्यक्रमांमुळे जाणार नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र काही आमदार नाराज असल्याने हा दौरा करत नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. तर काही बदनामीच्या भितीने जात नसून ढोबळ कारणे पुढे करून जात नसल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या उद्याच्या दौर्यात सहभागी न होणार्या आमदारांच्या भविष्यातील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Eknath Shinde Group
Eknath Shinde: कामाख्या देवीचं नवस आज फिटणार; CM शिंदे आमदारांसह आज गुवाहाटीला जाणार

तर मंत्री अब्दुल सत्तार, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री तानाजी सावंत, आमदार सुहास कांदे, आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटील, सौ लताताई सोनवणे, उदय सामंत शिंदे गटातील हे आमदार आणि मंत्री गुवाहाटी दौऱ्यावर जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतचे वृत्त साम या वृत्तवाहिनीने दिले आहे.

Eknath Shinde Group
Eknath Shinde: शिंदे गटाचा कामाख्या देवीचा नवस फिटणार

तर शंभूराजे देसाईही मतदार संघातच थांबले असल्याची माहिती समोर आली आहे. तर गुलाबराव पाटील यांच्या 'जिल्हा दूध संघाची निवडणूक असल्यामुळे ते जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत त्यांनी माहिती देताना सांगितलं की, निवडणुकीमुळे मला गुवाहाटीला जाता येणार नाही. मी जरी जाणार नसलो तरी आमचे बाकीचे सर्व आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला जाणार आहेत. तर शिंदे गटाचे आमदार गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहेत', असंही गुलाबराव पाटील यांनी यावेळी सांगितलं आहे.

Eknath Shinde Group
Eknath Shinde: मुहूर्त ठरला! शिंदे गट पुन्हा जाणार गुवाहाटीला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com