Ajit Pawar: 'महाराष्ट्र तुमच्या सातबाऱ्यावर...' अजित पवार गटाचे आमदार भुजबळांच्या पाठीशी पण वरिष्ठांकडून देण्यात आल्या खास सूचना

देवगिरीवर राष्ट्रवादीच्या बैठकीत मनोज जरांगेच्या राजकीय नेत्यांबाबतच्या भूमिकेबाबतही चर्चा झाल्याची माहिती आहे.
Ajit Pawar
Ajit PawarEsakal

राज्यात आरक्षणाच्या मुद्यावरून राजकारण पेटलं आहे. मराठा आंदोलक आणि राज्यातील काही नेते यांच्यात आरोप-प्रत्यारोप यांचे सत्र सुरू आहे. अशातच काल(मंगळवारी) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवगिरीवरील कालच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या(अजित पवार गट) आमदारांशी चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यात आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना समाजात जातीय तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्या, अशी सूचना अजित पवार यांनी आमदारांना दिल्याची माहिती आहे. इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण मिळावे, हीच आपलीही भूमिका असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. त्याचबरोबर कर्जतमध्ये होणाऱ्या शिबीरासाठी सर्व नेत्यांना हजर राहण्याच्या वरिष्ठांकडून सूचना देण्यात आल्याचीही माहिती आहे.

Ajit Pawar
Rajasthan Election: ऐन निवडणुकीत काँग्रेसला धक्का! अनेकांनी धरली भाजपची वाट; प्रभावी नेत्यांनाच डावललं

दरम्यान, या बैठकीसाठी मंत्री छगन भुजबळ देखील उपस्थित होते. भुजबळांना थ्रोट इंफेक्शन झाल्यामुळे ते संपूर्ण बैठकीत तोंडावर मास्क लावून बसले होते. गेल्या काही दिवसांमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून घेतलेल्या भूमिकेमुळे छगन भुजबळ चांगलेच चर्चेत आहेत. यासंबधीचे वृत्त 'साम टिव्ही'ने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

Ajit Pawar
Shivsena: आमदार अपात्रतेसंबंधी सलग सुनावणी; ठाकरे गटाच्या सुनील प्रभूंची साक्ष पूर्ण, कालच्या सुनावणीवेळी काय घडलं?

देवगिरीवर राष्ट्रवादीच्या बैठकीत मनोज जरांगेच्या राजकीय नेत्यांबाबतच्या भूमिकेबाबतही चर्चा झाल्याची माहिती आहे. बैठकीत गावबंदीबाबत आमदारांनी निषेध व्यक्त केला आहे. मनोज जरांगे यांना उद्देशून केलेल्या महाराष्ट्र तुमच्या सातबाऱ्यावर लिहून दिला आहे का? या भुजबळांच्या वक्तव्याला आमदारांनी समर्थन दिलं आहे. आमदारांनी मराठा आरक्षण आणि जरांगे यांच्याबाबत जपून बोलावे, अशा सूचना वरिष्ठांकडून आमदारांना देण्यात आल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com