विधानपरिषद निकालानंतर भाजपचे आरोप, शिवसेनेनं प्रत्युत्तर देत नागपूरवरून डिवचलं; म्हणाले, आत्मपरीक्षणाची गरज

BJP Shiv Sena Clash भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी विधानपरिषद निवडणुकीतील महायुतीच्या पराभवावरून शिवसेनेच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी प्रत्युत्तर देताना भाजपला टोला लगावला आहे.
Maharashtra MLC Polls BJP Faces Questions After Defeat

Maharashtra MLC Polls BJP Faces Questions After Defeat

Esakal

Updated on: 

विधानपरिषदेच्या पाचपैकी तीन जागांवर महायुतीला पराभवाचा धक्का बसला. त्यानंतर भाजपने पुणे आणि संभाजीनगरमध्ये शिवसेनेने अपेक्षित सहकार्य केलं नाही, उलट विरोधात काम केल्याचा आरोप केला. भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांच्या आरोपांना शिवसेनेचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी उत्तर दिलं. भाजपने ‘सगळ्या जागा आम्हीच लढवणार’ या भूमिकेला मुरड घालावी, असं म्हणत त्यांनी मित्रपक्षाचे कान टोचले. नागपुरात थेट लढत झाली, तिथे काय निकाल लागला, हेही पाहावं, असं परांजपे म्हणाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com