esakal | ठाकरे सरकार निश्‍चित परभणीतला शब्द पाळतील : प्रवीण दरेकर
sakal

बोलून बातमी शोधा

ठाकरे सरकार निश्‍चित परभणीतला शब्द पाळतील : प्रवीण दरेकर

विकासकामांपेक्षा विद्यमान सरकार रोज वेगवेगळ्या प्रकारचे राजकारण करत आहे. सुडाने भरलेले हे सरकार आहे. संकटाच्या काळात राजकारण करु नये, असेही त्यांनी ठणकावले.

ठाकरे सरकार निश्‍चित परभणीतला शब्द पाळतील : प्रवीण दरेकर

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसान भरपाईसंबंधी परभणीत दिलेला शब्द पाळावा, अन्यथा, भारतीय जनता पक्ष राज्यभर जनआंदोलन उभारेल, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी दिला. सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्त भागाची श्री. दरेकर यांनी गुरुवारी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

आमदार प्रवीण दरेकर म्हणाले,  सातारा जिल्ह्यात 90 टक्क्यांवर शेती नुकसानीचे पंचनामे झाले आहेत. तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक स्वतंत्र सर्व्हे करत असून यंत्रणा चांगल्या पद्धतीने काम करत आहे. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केलेल्या घोषणेबाबत विचारले असता ते म्हणाले, ""सोलापूर आणि उस्मानाबाद दौऱ्यावर आल्यावर मुख्यमंत्री काही तरी घोषणा करतील, असे वाटले होते. हा विषय आम्ही राजकीय दृष्टीतून पाहात नाही. अशा वेळी शेतकऱ्यांसाठी एका बाजूला दीर्घकाळ उपाययोजना, तर दुसऱ्या बाजूला तत्कालीन उपाययोजना करण्याची आवश्‍यकता आहे.

वेळप्रसंगी शेतकऱ्यांसाठी सरकारवर दबाव आणू; दरेकरांचा ठाकरे सरकारला इशारा 

फडणवीस सरकारच्या काळात ओल्या दुष्काळाच्या काळात स्वतंत्र अध्यादेश काढला होता. नुकसानग्रस्त कोरडवाहू शेतीसाठी 25 हजार, बागायती शेतीसाठी 50 हजार व फळबाग लागवडीसाठी एक लाख रुपये द्यावेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र आहेत. त्यामुळे ठाकरे सरकार निश्‍चित परभणीत दिलेला शब्द पाळतील. त्यांनी दिलेला शब्द पाळावा. अन्यथा, भाजप राज्यभर जनआंदोलन उभारेल. मदत मिळाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही.''

नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना 50 हजार रुपये देणार होता त्याचे काय झाले? छोट्या शेतकर्‍यांची शेती उद्धवस्त झाली असून खर्च वाया गेला आहे. कर्जाचे हप्‍ते द्यायला शेतकर्‍यांकडे पैसे नाहीत. अशा शेतकर्‍यांना कर्जमाफी द्यावी. जिल्हाधिकार्‍यांना याबाबत शासनास कळवण्याच्या सुचना केल्या आहेत. फडणवीस सरकारने विशेष जीआर काढून हेक्टरी 18 हजार रुपये दिले. शेळ्या, जनावरांना पैसे दिले. 15-20 हजारांची तात्काळ मदत राज्य सरकारने केली पाहिजे. दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आहे. रस्ते, पूल दुरुस्त करण्यासाठी मागणी दिली आहे.

फडणवीस आणि दरेकर राज्य ताब्यात घेतील : उदयनराजे

भात, भुईमूग, सोयीबीन वाया गेले.  मायबाप सरकारने या परिस्थिीकडे संवेदनशीलपणे पहावे. शेतकर्‍यांचा उदरनिर्वाह सुरु राहण्यासाठी 10 ते 15 हजार रुपये तात्काळ त्यांच्या खात्यावर जमा करा. वाहून गेलेली शेती 4-5 लाख रुपये खर्च केल्याशिवाय नीट होणार नाही. ठिबक सिंचनचे नुकसान झाले असून याचा दीर्घकालीन योजनांमध्ये अंतर्भाव करावा, अशी त्यांनी मागणी केली. 

मदतीसाठी राज्य सरकार हतबल आहे, केंद्र शासन मदत करणार का? असे विचारले असता आमदार प्रविण दरकेकर म्हणाले, पंतप्रधान राज्याच्या पाठिशी आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांच्याशी संपर्क साधला आहे. त्यांना प्रस्ताव पाठवण्याच्या सुचना त्यांनी केल्या आहेत. केवळ केंद्रावर ढकलून टोलवाटोलवी करुन राज्य सरकारला जबाबदारीपासून दूर पळता येणार नाही. केंद्र शासन मदत करेल. दोन दिवसांत मदत नाही मिळल्यास संघर्षाची तयारी करु, असा इशारा त्यांनी दिला.

loading image