मुंबईतील खड्ड्यांवरून मनसेचे तोडफोड आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जुलै 2018

मुंबई : मुंबई शहराला खड्ड्यांचा प्रश्न सतावत आहे. खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली असून, यामुळे अनेक अपघात होत आहेत. वारंवार तक्रार करूनही मुंबई महापालिकेच्या ढिम्म कारभाराला वाचा फुटत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) तिव्र आंदोलन केले. मनसेच्या कार्यकर्त्यांनी तुर्भे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात तोडफोड केली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला असून, जर सरकारला रस्त्यांवरचे खड्डे दिसत नसतील तर आंदोलन नक्कीच दिसेल. असे म्हटले आहे.

तुर्भे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयातील खुर्च्या, टेबल, खिडकीच्या काचांची तोडफोड कार्यकर्त्यांनी केली आहे. या आंदोलनाला मनसेने सर्जिकल स्ट्राईक म्हटले आहे. तोडफोड करताना कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे, प्रवीण पोटे, चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात घोषणा दिल्या. या प्रकरणी पोलिसांनी मनसेच्या पाच कार्यकरत्यांना ताब्यात घेतले आहे.

मुंबईत्यल्या सर्वच भागात खड्ड्यांच्या प्रश्नाने गंभीर रुप धारण केले आहे. एमएसआरडीसीचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन दिवसांपुर्वीच खड्ड्यांमुळे झालेल्या रस्त्यांच्या दुरावस्थेची पाहणी केली होती. पंरतु, त्याचा काही उपयोग झाला नाही. मुळातच खड्डे बुजवताना करण्यात आलेल्या नुकृष्ट दर्जाच्या कामामुळे थोड्याश्या पावसानेही रस्त्यावरील खडी वाहून जाते. मात्र, याचा त्रास मुंबईकरांना सहन करावा लागत आहे.

सायन पनवेल दरम्यान बांधण्यात आलेल्या महामार्गासाठी सरकारने बारेशा कोटी रुपये खर्च केले आहेत. या रस्त्याला टोलही आकारला जातो. मात्र, या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे पाच नागरिकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. 

Web Title: MNS agitated movement from the potholes in Mumbai