Loksabha 2019 : राज ठाकरेंच्या सभांचा खर्च कुणाच्या नावावर; आयोग संभ्रमात

वृत्तसंस्था
शनिवार, 13 एप्रिल 2019

मनसे लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असे राज ठाकरे यांनी जाहीर केले होते. त्यावेळी आपण भाजप-शिवसेना सरकारविरोधात प्रचार करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार राज ठाकरेंनी यांच्या विविध सभा राज्यभरात होत आहेत. आता राज  यांनी आपल्या पुढील सभेत याबाबत भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे.

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेमुळे निवडणूक आयोगाची चांगलीच पंचाईत झाली आहे. कारण, आचारसंहिता काळात सभांचा खर्च हा उमेदवाराच्या नावावर टाकला जातो. मात्र, मनसेचा एकही उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात नाही. त्यामुळे राज ठाकरे यांच्या सभेचा खर्च कुणाच्या नावावर टाकायचा हा प्रश्न निवडणूक आयोगासमोर निर्माण झाला आहे.

राज ठाकरे यांची शुक्रवारी रात्री नांदेडमध्ये जाहीर सभा झाली. सभेतून राज ठाकरे भाजप-शिवसेना युतीवर जोरदार टीका केली असताना, आता दुसरीकडे निवडणूक आयोगाला वेगळाच प्रश्न सतावत आहे. आचारसंहिता काळात सभांचा खर्च हा उमेदवाराच्या नावावर टाकला जातो. मात्र, मनसेचा एकही उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात नाही. त्यामुळे राज ठाकरे यांच्या सभेचा खर्च कुणाच्या नावावर टाकायचा हा प्रश्न निवडणूक आयोगासमोर निर्माण झाला आहे.

मनसे लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असे राज ठाकरे यांनी जाहीर केले होते. त्यावेळी आपण भाजप-शिवसेना सरकारविरोधात प्रचार करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार राज ठाकरेंनी यांच्या विविध सभा राज्यभरात होत आहेत. आता राज  यांनी आपल्या पुढील सभेत याबाबत भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे.

Web Title: MNS chief Raj Thackeray campaign in Maharashtra for Loksabha election