EKnath Shinde Raju Patil
EKnath Shinde Raju PatilSakal

Eknath Shinde : लेक श्रीकांतसाठी CM शिंदे राजू पाटलांना भेटले; मनसेच्या ज्येष्ठ नेत्याचं सूचक विधान

एवढं राजकारण समजण्याइतके आम्ही नक्कीच प्रगल्भ आहोत, असंही ते म्हणाले आहेत.
Published on

CM Eknath Shinde in Thane : राज ठाकरेंच्या सभेच्या अवघ्या काही तास आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसेचे आमदार राजू पाटील यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. त्यानंतर चर्चांना चांगलंच उधाण आलं आहे. श्रीकांत शिंदे यांच्यासाठी मुख्यमंत्री शिंदे राजू पाटलांना भेटले, असं सूचक वक्तव्य मनसेच्या ज्येष्ठ नेत्याने केलं आहे. (CM Eknath Shinde Meets MNS MLA Raju Patil)

EKnath Shinde Raju Patil
Raj Thackeray : राज ठाकरेंची सभा अन् मुख्यमंत्री शिंदेंची मनसे कार्यालयाला भेट; राजू पाटील म्हणाले...

मनसेचा गुढीपाडवा मेळावा आज आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी राज्यभरातून मनसैनिक मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावर दाखल झाले आहेत. मनसेचे (MNS) ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन हेदेखील सभेसाठी आलेले आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मनसे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीबद्दल त्यांनी सूचक भाष्य केलं आहे.

EKnath Shinde Raju Patil
Raj Thackeray : "राज ठाकरे भावी मुख्यमंत्री तर मग मी पंतप्रधान" ; NCP नेत्याचा खोचक टोला

यावेळी बोलताना प्रकाश महाजन म्हणाले, "नवीन सून घरात आल्यावर नम्रतेने वागते त्यांचं तसं आहे. राजू पाटलांना नम्रता दाखवणं ही त्यांची गरज आहे. त्यांच्याशी नम्रता दाखवली नाही तर श्रीकांत शिंदेंचं काय व्हायचं? एवढं राजकारण समजण्याइतकं आम्ही प्रगल्भ आहोत."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com