Raj Thackeray: राज्यातील उष्णतेच्या लाटेमुळे राज ठाकरेंकडून चिंता व्यक्त; मुलांच्या शाळेबाबत सरकारकडे महत्त्वाची मागणी

Heatwave Warning in Maharashtra :राज्यात उष्णतेची लाट आली आहे. मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यासाठी हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.
Raj Thackeray
Raj Thackeray

मुंबई- राज्यात उष्णतेची लाट आली आहे. मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यासाठी हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी यासंदर्भात एक्सवर एक पोस्ट केली आहे. वाढत्या उन्हाबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली असून काही सूचना केल्या आहेत.

राज ठाकरे आपल्या पोस्टमध्ये म्हणालेत की, सस्नेह जय महाराष्ट्र, गेले काही दिवस मुंबई, ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, कोकण ह्या भागात दिवसाचं सरासरी तापमान हे जवळपास ४० अंशांपर्यंत गेलं आहे. अर्थात उर्वरित महाराष्ट्रात पण काही वेगळी स्थिती नाहीये. उष्णतेची लाट आली आहे असं जाहीर झालं आहे. मुळात अशी लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने आधीच का नोंदवली नाही?, हा मुद्दा आहे. असो. (mns chief raj thackeray x post on heatwave warning in maharashtra)

Raj Thackeray
Raj Thackeray With Bjp: भाजप खासदाराच्या पोस्टरवर झळकले मनसे अध्यक्ष राज ठाकरे; पोस्ट झाली व्हायरल

अशा परिस्थितीत लहान मुलांच्या शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या सुरु व्हायला अजून काही काळ असल्यामुळे त्यांना शाळेत जावं लागत आहे. ह्याबाबतीत, जरी आचारसंहिता असली, तरी सरकारने शाळांना आत्ताच उन्हाळी सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश देण्याची तजवीज करायला हवी, असं राज ठाकरे म्हणालेत.

उन्हाळ्याचा दीर्घकाळ शिल्लक आहे, त्यामुळे हवामानात काय बदल होऊ शकतील ह्याचे अचूक अंदाज आले तर एकूणच लोकांना त्यांच्या कामांचं नियोजन करता येईल. माझी माझ्या महाराष्ट्र सैनिकांना पण विनंती आहे की, तुम्ही पण उष्णतेच्या लाटेत स्वतःची काळजी घ्या. तसंच ह्या भीषण उन्हाळ्यात सगळ्यात जास्त हाल होतात प्राण्यांचे आणि पक्षांचे (राजकीय नव्हेत ) आणि निराधार आणि बेघर लोकांचे. त्यांना प्यायला स्वच्छ पाणी मिळेल ह्याची तजवीज करा, अशा सूचना राज यांनी केलं आहे.

Raj Thackeray
MNS News: राज ठाकरे आधुनिक युगातील कर्ण; त्यांनी हिंदुत्वाची शाल पांघरून मदत मागणाऱ्यांना मदत केली

प्राणी आणि पक्षी तर बिचारे पाणी मागू शकत नाहीत, त्यामुळे, त्यांना सहज पाणी मिळेल आणि सहज पिता येईल अशा पद्धतीने गॅल्लरीत, गच्चीत पाणी ठेवा, असं राज ठाकरे आपल्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत. (Raj Thackeray)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com