Raj Thackrey: राज ठाकरेंनी मानले फडणवीसांचे आभार; म्हणाले, अशीच राजकीय संस्कृती... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackeray: राज ठाकरेंनी मानले फडणवीसांचे आभार; म्हणाले, अशीच राजकीय संस्कृती...

Raj Thackeray: राज ठाकरेंनी मानले फडणवीसांचे आभार; म्हणाले, अशीच राजकीय संस्कृती...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून भाजपने अंधेरीची निवडणूक लढवू नये अशी विनंती करत पत्र लिहालं होतं. दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी आमदार झाल्यास रमेश यांच्या आत्म्यास खरोखर शांती मिळेल माझी विनंती आहे की भारतीय जनता पक्षानं ती निवडणूक लढवू नये, अशी विनंती राज ठाकरे यांनी आपल्या पत्रातून केली होती. त्यानंतर आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उमेदवार मुरजी पटेल हे माघार घेणार असल्याची घोषणा केली.

भाजपच्या या निर्णयानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्र लिहून आभार व्यक्त केले आहेत. पत्रामद्धे राज ठाकरे यांनी लिहले आहे की, काल मी केलेल्या विनंतीला मान देऊन आपण अंधेरी (पूर्व) च्या पोट-निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतलात ह्याबद्दल आपले, आपल्या सहकाऱ्यांचे आणि पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळींचे शतश: आभार.

हेही वाचा: Andheri by election : 'राज ठाकरेंचं पत्र की...?' या 5 कारणामुळे भाजपाची माघार

चांगली, सकारात्मक राजकीय संस्कृती ही सुदृढ समाजासाठी आवश्यक असते. अशी राजकीय संस्कृती असावी, वाढावी आणि राजकीय मंचावर आपापले मुद्दे घेऊन राजकीय पक्षांनी निकोप स्पर्धा करावी असा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही कायम करत असतो. त्याला आज तुम्ही प्रतिसाद दिलात ह्याबद्दल तुम्हा सर्वांचे पुनःश्च आभार अशा शब्दात राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

हेही वाचा: Andheri By-election : अपक्ष निवडणूक लढवणार का? मुरजी पटेलांचं उत्तर