मनसेच्या स्टेजवर सावरकरांचा फोटो, काय संकेत?

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 January 2020

या अधिवेशनात राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष्य लागले असतानाच, पक्षात मोठ्या प्रमाणात बदल होणार असल्याचे सूतोवाच पक्षाच्या नेत्यांनी दिले आहेत. मनसे गेल्या अनेक दिवसांपासून पक्षाचा झेंडा आणि अजेंडा बदलण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती.

मुंबई : राज्यात बदललेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही (मनसे) कात टाकत असून, आज (गुरुवार) होत असलेल्या अधिवेशनासाठी सजविण्यात आलेल्या स्टेजवर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचाही फोटो ठेवण्यात आल्याने मनसे आपली भूमिका बदलणार हे निश्चित आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या अधिवेशनात राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष्य लागले असतानाच, पक्षात मोठ्या प्रमाणात बदल होणार असल्याचे सूतोवाच पक्षाच्या नेत्यांनी दिले आहेत. मनसे गेल्या अनेक दिवसांपासून पक्षाचा झेंडा आणि अजेंडा बदलण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती. आज सकाळी पहिल्यांदा झेंड्याचे अनावरण होणार आहे. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता राज ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. 

नवा झेंडा नवा अजेंडा? आज मनसेचा पहिलावहिला महामेळावा..

आज सकाळी नऊच्या सुमारास राज ठाकरे आपल्या निवासस्थानाहून गोरेगावमधील नेस्को मैदानात पोहचले. त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीयही होती. या कार्यक्रमासाठी सजविण्यात आलेल्या स्टेजवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, प्रबोधनकार ठाकरे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे फोटो ठेवण्यात आले आहेत. मनसेचा झेंडा बदलून तो भगवा केला जाणार हे यावरून जवळपास स्पष्ट होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS to have a new saffron flag Savarkar frame on stage as well