Sushma Andhare : मनसेच्या नेत्याकडून सुषमा अंधारेचा उल्लेख 'काळी मांजर' mns leader Gajanan kale mentioned black cat to shivsena Thackrey groups leader Sushma andhare | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sushma Andhare

Sushma Andhare : मनसेच्या नेत्याकडून सुषमा अंधारेचा उल्लेख 'काळी मांजर'

राज्याच्या राजकारणात टीका-टिप्पणी करत असतात. पण काही नेते अगदी खालच्या स्तराला जाऊन नेत्यांवर टीका करतात. काही नेते महिलांवरतीही अगदी खालच्या स्तरावर जाऊन टीका करतात. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटातील उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यापासून ते अगदी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर पातळी सोडून टीका केली आहे.

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर गजानन काळे यांनी टीका करताना सुषमा अंधारे यांचा उल्लेख काळी मांजर केला आहे. काळी मांजर सारखं आडवी जाते असं म्हणत टीका केली आहे. त्यामुळे आता मनसे आणि सुषमा अंधारे यांचा वाद चिघळणार असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा: Shivsena-VBA Alliance: बाळासाहेबांच्या जयंतीच्या मुहूर्तावर राज्याच्या राजकारणात नवे पर्व

काय म्हणाले आहेत गजानन काळे?

काळी मांजर सारखं आडवी जाते. शरद पवार यांनी टीका करण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये खासदार संजय राऊत ठेवले होते. आता त्यांना शांत बसवून या हे पार्सल राष्ट्रवादीतून ठाकरे गटाकडे का पाठवलय. गजानन काळे यांच्या या वक्तव्यामुळे भविष्यात गजानन काळे आणि सुषमा अंधारे यांच्यात वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Sharad Pawar : मी असल्या भानगडीत पडत नाही; ठाकरे-आंबेडकर युतीवर पवारांची पहिली प्रतिक्रिया

संजय राऊत असो की सुषमा अंधारे असो आता हा पक्ष संपणारच आहे आणि या पक्षात आता उरलेसुरले दोघं बापलेकच राहणार असल्याचे दिसून येणार आहे असा टोला काळे यांनी ठाकरे कुटुंबीयांला लगावला आहे. त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांना जाहीर आव्हान करताना ते म्हणाले की, त्यांनी आपल्या घराचा परिसर सोडून वरळीतून निवडणूक का लढवली आहे असा सवाल त्यांनी आदित्य ठाकरे यांना विचारला आहे.

हेही वाचा: Brijbhushan Singh : ब्रिजभूषण यांना मोठा धक्का! लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर विशेष बैठक रद्द