
Shivsena-VBA Alliance: बाळासाहेबांच्या जयंतीच्या मुहूर्तावर राज्याच्या राजकारणात नवे पर्व
Shivsena-VBA Alliance: राज्याच्या राजकारणात काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. अशातच गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू असणाऱ्या शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या युतीचा नवा पॅटर्न आज समोर येणार आहे.
बाळासाहेबांच्या जयंतीच्या मुहूर्तावर शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची आज युती होणार असल्याची घोषणा करण्यात येणार आहे. याबाबतचे स्पष्ट संकेत शिवसेनेच्या आणि वंचितच्यावतीने देण्यात आले आहेत. आज दुपारी 1 वाजता यासंबंधित एक पत्रकार परिषद होणार आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या युतीची घोषणा होणार असल्याचं ट्विट केलं आहे. शिवशक्ती आणि भीमशक्तीचा एल्गार, संयुक्त पत्रकार परिषद.
23 जानेवारी दुपारी 12.30 वाजता. आंबेडकर भवन, नायगाव, दादर महाराष्ट्राच्या राजकारणातील नवे पर्व… अशा प्रकारचं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.
हेही वाचा: Mumbai Fire : कुर्ल्यातील शिवाजी मंडईला आग; 25 दुकाने जाळून खाक
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने शिवसेनेच्यावतीने आज राज्यात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केलं आहे.
हाच मुहूर्त साधून शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा केली जाणार आहे. तर दुसरीकडे आज विधीमंडळामध्ये राज्य सरकारच्या वतीनं बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं अनावरण करण्यात येणार आहे.
हेही वाचा: Sharad Pawar : मी असल्या भानगडीत पडत नाही; ठाकरे-आंबेडकर युतीवर पवारांची पहिली प्रतिक्रिया
वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काल पत्रकार परिषद घेतली तेव्हा ते म्हणाले की, "वंचित आणि शिवसेना युतीवर शिवसेनेकडून घोषणा होऊ शकते. यावर अजूनही दोन्हीकडून चर्चा सुरू आहे.
उद्धव ठाकरे यांनी या युतीमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेतलं पाहिजे असं मत मांडलं होतं. आम्ही काँग्रेस- राष्ट्रवादीसोबतही जायला तयार आहोत. याआधी काँग्रेस-राष्ट्रवादीने आम्हाला नाकारलं आहे. सध्या वंचित आणि शिवसेना युती होईल. माझी युती ही शिवसेनेसोबत असेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नंतर पाहून घेऊ."
हेही वाचा: Shambhuraj Desai : मराठा आरक्षणासाठी भक्कम बाजू मांडतोय; शंभूराज देसाई