मनसे नेते म्हणतात, उद्धवा अजब तुझे सरकार

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 22 January 2020

मुंबईत गुरुवारी (ता. 23) मनसेचे राज्यव्यापी अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात मनसे नव्या रुपाने समोर येणार आहे. या अधिवेशनात राज ठाकरे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

मुंबई : मुंबई पोलिस दलात अश्वांचा समावेश करण्यात आल्याने मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सरकारच्या निर्णयावर टीका करत उद्धवा अजब तुझे सरकार असे म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुंबईत गुरुवारी (ता. 23) मनसेचे राज्यव्यापी अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात मनसे नव्या रुपाने समोर येणार आहे. या अधिवेशनात राज ठाकरे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यापूर्वीच मनसे नेते राज्यातील सत्ताधारी महाविकासआघाडी सरकारवर टीका करताना दिसत आहेत. संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

नाइट लाइफ... अंधारातले, उजेडातले

संदीप देशपांडे यांनी ट्विट करत म्हटले आहे, की जग घोड्यावरून चांद्रयानाकडे गेलं आमचं पोलिस दल चांद्रयानाकडून घोड्यावर आलं... उद्धवा अजब तुझे सरकार. त्यांनी यापूर्वीही सरकारच्या निर्णयावर टीका केलेली आहे. तसेच अधिवेशनानिमित्त मंत्रालयातील गोड गोड अळूच फदफद आवडत की शेतावरची मिरची ठेचा आणि भाकरी निर्णय तुमचा..., असे ट्विट त्यांनी अधिवेशनापूर्वी केलेले आहे. त्यामुळे आता मनसे पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS leader Sandip Deshpande target Uddhav Thackeray