सगळं बंद ठेवून विरप्पन गँगचे घोटाळे लपणार नाहीत - मनसे

CM Uddhav Thackeray
CM Uddhav ThackerayTeam eSakal
Summary

राज्यात अद्यापही काही निर्बंध कायम आहेत. त्यावरून मनसेने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

राज्यात कोरोनामुळे लागू करण्यात आलेले निर्बंध आता हळू हळू शिथिल केले जात आहेत. राज्य सरकारने घटस्थापनेच्या मुहुर्तावर राज्यातील मंदिरे सुरु करण्यास परवानगी दिली आहे. दरम्यान, राज्यात अद्यापही काही निर्बंध कायम आहेत. त्यावरून मनसेने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. सगळं बंद ठेवून विप्पन गँगचे घोटाळे लपणार नाहीत ते आम्ही बाहेर काढणारच असा इशारा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिला आहे.

संदीप देशपांडे यांनी ट्विटरवर म्हटलं की, सध्या सगळी कडे टाळे बंदी शिथिल झाली असताना अजूनही स्थायी समितीच्या बैठका आणि महापालिका सभागृह ऑनलाईन का चालू आहे? सगळं बंद ठेऊन विरप्पान गॅंग चे घोटाळे लपणार नाहीत ते आम्ही बाहेर काढणारच.

CM Uddhav Thackeray
राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, सात जिल्ह्यांना अलर्ट

कोरोनावरून महाराष्ट्र सरकारवर मनसे नेते संदीप देशपांडे यापूर्वीही ट्विटरवरून अनेकदा निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटलं होतं की, महाराष्ट्रात कोरोनाचं एवढं स्तोम माजवलं जातंय की, यापुढे कोरोना हा चायनीज व्हायरस ऐवजी महाराष्ट्र सरकार व्हायरस म्हणून जगात ओळखला जाईल. या सरकारने कोरोना संबंधित सर्व डेटा जनतेबरोबर पारदर्शकपणे शेअर केला पाहिजे. दरम्यान, मनसेने दोन डोस घेतलेल्या लोकांसाठी लोकल प्रवासाला मुभा देण्याची मागणी केली होती. त्या संदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांचीसुद्धा भेट घेतली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com