'कलानगरचे सर्कीट', फोटो ट्विट करत शालिनी ठाकरेंचे उद्धव यांना प्रत्युत्तर

MNS Leader Shalini Thackeray on Uddhav Thackeray
MNS Leader Shalini Thackeray on Uddhav Thackeraye sakal
Updated on

मुंबई : हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray VS Raj Thackeray) आणि मनसे प्रमुख राज ठाकरे हे दोन्ही भाऊ एकमेकांवर टीका करताना दिसतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सायंकाळी बीकेसी मैदानावर सभा घेतली. यावेळी मुन्नाभाई म्हणत राज ठाकरेंवर टीका केली. तसेच स्वतःला बाळासाहेब ठाकरे समजतात, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. त्यानंतर आता मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे (Shalini Thackeray) यांनी राज आणि बाळासाहेबांचा एक फोटो ट्विट करून उद्धव यांना प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी कलानगरचे सर्कीट, अशी टीका उद्धव ठाकरेंवर केली आहे.

MNS Leader Shalini Thackeray on Uddhav Thackeray
'राज'कीय लोचा ते फडणवीसांचं वजन; उद्धव ठाकरेंचं भाषण एका क्लिकवर..

कधी बाळासाहेब दिसतात, तर भगवी शाल घेऊन फिरतात, असे म्हणणाऱ्यांना हा फोटो सर्वकाही सांगून जातो. फक्त कलानगरच्या सर्किटला दिसत नाही, असं जोरदार प्रत्युत्तर शालिनी ठाकरेंनी उद्धव यांना दिलं आहे. सोबतच राज यांच्या अर्ध्या चेहऱ्यावर बाळासाहेबांचा फोटो लावत दोघं कसे मिळते-जुळते दिसतात, असं दाखवण्याचा प्रयत्न शालिनी यांनी केला आहे.

मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले होते? -

मला कोणीतरी विचारलं, की मुन्नाभाई चित्रपट बघितला का? तसाच मुन्नाभाई आपल्या महाराष्ट्रात आहे. मी विचारलं, की कोण? तर कधी मराठीचा मुद्दा लावून धरतात, तर कधी हिंदूत्वावर बोलतात. स्वतःला बाळासाहेब समजतात आणि आजकाल भगवी शाल घेऊन फिरतात, तेच मुन्नाभाई, असं त्या व्यक्तीनं सांगितलं. पण, त्या चित्रपटातील मुन्नाभाईला आपल्या डोक्यात केमिकल लोचा झाला होता हे कळलं होतं. तसंच यांचंही झालं. या मुन्नाभाईला फिरू द्या, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर मनसेकडून उद्धव ठाकरेंवर टीका केली जात आहे.

दरम्यान, राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यापूर्वीही म्हणाले होते. शनिवारच्या सभेत देखील त्यांनी राज ठाकरेंचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com