अतृप्त आत्मे माझ्या भोवती फिरणार पण नाहीत; वसंत मोरेंचा नेमका कोणाला इशारा? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MNS leader Vasant More

'माझ्या प्रभागात हनुमान चालिसा लावायची गरज पडली नाही.'

अतृप्त आत्मे माझ्या भोवती फिरणार पण नाहीत; वसंत मोरेंचा नेमका कोणाला इशारा?

पुणे : भोंगा विरुद्ध हनुमान चालिसा हा वाद सुरू असताना मनसेचे वसंत मोरे (Vasant More) यांच्याकडं मात्र, हिंदू-मुस्लीम एकतेचे अनोखे चित्र पाहायला मिळालं आहे. आज संध्याकाळी वसंत मोरे यांनी हनुमानाच्या महाआरतीचं (Hanuman Maha-arati) नियोजन केलं असून त्याची तयारीही सुरूय. याच पार्श्वभूमीवर वसंत मोरेंनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

मोरे म्हणाले, कालच मी आरतीसाठी परवानगी घेतलीय. शहरात अनेक ठिकाणी आरती झाल्या. मात्र, राज ठाकरेंच्या हस्ते जी आरती झाली, त्यातच खरा जोश होता. मला शहरातील पदाधिकाऱ्यांना हेच दाखवायचंय की, आपण जर पोलिस ठाण्याकडून रितसर परवानगी घेतल्या असत्या, तर अशाच प्रकारे आपण आरती करू शकलो असतो, असं त्यांनी नमूद केलंय.

हेही वाचा: कर्नाटकात काँग्रेसला मोठा झटका; माजी कॅबिनेट मंत्र्यानं सोडला पक्षाचा 'हात'

आत्तापर्यंत सगळे वार छातीवर घेतले आहेत. मी राज ठाकरेंना या आरतीची माहिती दिली होती. ही आरती कात्रजची होती, मी उपनगरचा नगरसेवक आहे. माझ्या प्रभागात हनुमान चालिसा लावायची गरज पडली नाही. तसेच मला हनुमान चालिसा पोलिस स्टेशनसमोर वाजवण्याचीही गरजच पडणार नाहीय. पक्षामध्ये काही जण पार्टटाइम जॉब करतात. अनेक जण पक्षाची जाहिरात वापरून घेतात आणि कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडतात, हे मी पाहिलंय. आज अतृप्त आत्मे माझ्या भोवती फिरणार पण नाहीत, असाही इशारा त्यांनी यावेळी दिलाय.

Web Title: Mns Leader Vasant More Hanuman Maha Aarti In Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top