'राज ठाकरे म्हणजे एक अव्वल कलाकार' केदार शिंदे यांची खास पोस्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kedar shinde on raj thackeray

'राज ठाकरे म्हणजे एक अव्वल कलाकार' केदार शिंदे यांची खास पोस्ट

शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे (shahir sable) म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके शाहीर साबळे. शाहीर साबळे यांच्या गाण्यांवर महाराष्ट्रानेच नाही तर जगाने प्रेम केलं. त्यांचं महाराष्ट्र गीत असो, खंडोबाचा जागर किंवा कोळी गीत.. प्रत्येकच गाणं हे माणसाच्या काळजात हात घालणारं. शाहीर साबळे यांनी महाराष्ट्राला दिलेली 'महाराष्ट्राची लोकधारा' आजही अनेकांच्या स्मरणात आहे. शाहीर साबळे यांच्या पश्चात हा वारसा त्यांचा नातू म्हणजेच दिग्दर्शक केदार शिंदे पुढे नेत आहेत आणि आता तर शाहीर साबळे यांच्या जीवनावर ते चित्रपट करत आहेत. (Maharashtra Shahir Movie Updates)

हेही वाचा: 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील देवकीला झाली मुलगी!

या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण १ मे महाराष्ट्र दिनी औरंगाबाद येथील सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी केदार शिंदे (KEDAR SHINDE ), अंकुश शिंदे उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाचा टिझर दाखवण्यात आला. यावेळी शाहीर साबळे यांच्या भूमिकेत अंकुश चौधरी (ankush chaudhari as shahir sabale) असल्याचे जाहीर होताच चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला. हा चित्रपट २८ एप्रिल २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाला अजय अतुल (ajay atul) यांचे संगीत असणार आहे

या अनावरण प्रसंगी मनसे अध्यक्ष राज ठाकरे 'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटाच्या पोस्टरकडे निरखून पाहत होते. या फोटो कॅमेऱ्यात कैद झाला. नुकताच हा फोटो दिग्दर्शक केदार शिंदे यांनी शेअर करून मनस्वी आनंद झाल्याचे म्हंटले आहे. हा आनंद व्यक्त करताना त्यांनी एक सुंदर कॅप्शन दिले आहे. 'आपल्या कलाकृतीकडे पाहणारा एक अव्वल कलाकार...' असे केदार शिंदे यांनी लिहीले आहे. राज ठाकरे यांची सौंदर्य दृष्टी सर्वांना ठाऊक आहे. ते उत्तम व्यंगचित्रकार आहेत. याशिवाय फिल्ममेकिंगचीही त्यांना आवड आहे. केदार यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहे.

Web Title: Maharashtra Shahir Raj Thackeray In Wonderful Artist Kedar Shinde On Raj Thackeray

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top