
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारपासून शिवसेनेनं फारकत घेतली आहे.
'बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांच्या विरुद्धची सध्याची शिवसेना'
मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांबाबत राज ठाकरेंनी सरकारला दिलेल्या अल्टिमेटमचा कालावधी काल संपला. त्याआधीच पोलिसांनी अॅक्शन मोडमध्ये येत मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरू केली आहे. त्यामुळे वाद आणखी उफाळून आला आहे. दरम्यान, राज्यात अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी पहाटे अजानच्या वेळी हनुमान चालिसा लाऊडस्पीकरवर वाजवली. तर काही ठिकाणी मनसेचे कार्यकर्ते सज्ज होते. पण अजान झालीच नाही. यातच राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा जुन्हा व्हिडीओ शेअर केला आहे. (Raj Thackeray Hanuman Chalisa Row) यावरून आता मनसैनिकांनी प्रतिक्रिया देत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा: भोंगा ही खरी समस्या नाही, RSS ला टॅग करत नितेश राणेंनी केली मोठी मागणी
झोपेचे सोंगं घेतले असले तर जागे कसं करणार असा टोला मनसे नेते नितिन सरदेसाई यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार त्यांची भुमिका आज राज ठाकरे यांनी ट्वीटच्या माध्यमातून मांडली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारपासून शिवसेनेनं फारकत घेतली आहे. मशिदीवर आज भोंगे लावले नाही ही सकारात्मक बाब आहे. यामुळे संघर्ष करायचा विषयच राहणार नाही, असंही सरदेसाई यांनी स्पष्ट केलं आहे.
या प्रकरणांवरून महाराष्ट्रात काही विपरित घडावे अशी आमची अपेक्षा नाही. शिवसेना आता बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाऱ्यांच्या विरूद्ध वागत आहे, अशी टीकाही त्यांनी ठाकरे सरकावर केली आहे. दरम्यान, आज राज्यभरातील मशिदींबाहेर पोलिस फौजफाटा तैनात आहे. तसेच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी राज ठाकरे यांच्या घराबाहेरील पोलिस सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा जुन्हा व्हिडीओ शेअर केल्याने हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: जोधपूर हिंसाचार: भाजप अध्यक्ष सतीश पुनियांचं राज्यपालांना पत्र
Web Title: Mns Nitin Sardesai Criticized To Thackeray Govt Balasaheb Thackeray Thoughts Not Follow Shivsena
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..