'हलाल'च्या मुद्द्यावर मनसेतील मतभेद चव्हाट्यावर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

mns no to halal campaign bala nandgaonkar yashwant-killedar mumbai news
mns no to halal campaign bala nandgaonkar yashwant-killedar mumbai news esakal

मुंबई : नुकतेच राज्यात मनसेकडून 'नो टू हलाल' (Halal Meat) ही मोहीम हाती घेण्यात आल्याचे समोर आले होते. मशिंदींवरील भोंग्याचा मुद्द्यावरील मोहिमेनंतर आता इस्लामिक पद्धतीने प्राण्याची होणारी कत्तल यावर आवाज उठवत मनसेने हलालचा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र मनसेची ही मोहीम सुरू होण्याआधीच मनसेच्या नेत्यांमधील मतभेद समोर आले आहेत. यशवंद किल्लेदार यांनी हलाल बाबतची भूमिका मांडल्यानंतर मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी या मोहिमेबाबत अधिकृत भूमिका नसल्याचे म्हटले आहे.

हलालच्या विरोधात ही मनसेची अधिकृत भूमिका असल्याचे मनसे नेते यशवंत किल्लेदार म्हणाले त्यांनी बाळा नांदगावकर यांना हा विषय माहिती नव्हता असे देखील म्हटले. तर हलाल विरोधातील भूमिका ही पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचे बाळा नांदगावकर म्हणाले होते. त्यामुळे हलाल बाबत मनसे पक्षातत मतभेद असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान हलाल अर्थव्यवस्थेतून जमा होणारा पैसा दहशतवादाच्या अंमलबजावणीसाठी वापरला जात असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला. त्यामुळे 'नो टू हलाल' या मोहिमेत सामील होण्याचे मनसेकडून आवाहनही करण्यात आले होते. मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी काल, शनिवारी पत्रकार परिषद घेत हा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र किल्लेदार यांनी 'नो टु हलाल' मीट प्रकरणी मांडलेली भूमिका ही अधिकृत नसल्याचं मनसेचे नेते बाळा नांदगावकर म्हणाले होते.

mns no to halal campaign bala nandgaonkar yashwant-killedar mumbai news
‘ना मिलो हमसे ज्यादा..; म्हणत १८ वर्षीय मुस्कान पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात

नांदगावकर काय म्हणाले

आमच्या एका कार्यकर्त्याने ती मागणी केली आहे, मात्र ती पक्षाची भूमिका नाही. जोपर्यंत पक्षप्रमुख एखादी मागणी करत नाही तोपर्यंत ती पक्षाची भूमिका होत नाही. त्यामुळे त्याच्यावर भाष्य करणे उचित नाही. एखादा कार्यकर्ता कुठंतरी पत्र देतो आणि त्यावर आम्ही भाष्य करणे हे उचित नाही असं बाळा नांदगावकर म्हणाले.

या विषयावर बोलताना मनले नेते यशवंत किल्लेदार म्हणाले की, विषय गेला महिनाभर आम्ही त्याच्यावर आभ्यास करतोय, त्यानुसार हा विषय पक्षाच्या मुख्य कार्यालयात अधिकृतपणे पत्रकार परीषद घेत राज ठाकरे यांच्या परवानगीने मांडला होता. जेव्हा या विषयावर बैठका चालल्या होत्या तेव्हा नेमकं नांदगावकर हे त्यांच्या घरगुती कामामुळे बैठकीला हजर नव्हते त्यामुळे त्यांचा गैरसमज झाला होता, ही पक्षाची अधिकृत भूमिका आहे असे सांगितले.

mns no to halal campaign bala nandgaonkar yashwant-killedar mumbai news
अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख ठरली; ‘या’ दिवशी मिळणार काँग्रेसला नवा अध्यक्ष

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com