‘ना मिलो हमसे ज्यादा..; म्हणत १८ वर्षीय मुस्कान पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Muskaan And Farukh

‘ना मिलो हमसे ज्यादा..; म्हणत १८ वर्षीय मुस्कान पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात

नवी दिल्ली – प्रेमात पडलं की माणसाला योग्य आणि अयोग्य यातील फरक दिसत नाही. जी व्यक्ती मनात भरली तिच्याशिवाय दुसरा कोणताच विचार मनात येत नाही. आपल्या प्रेयसी किंवा प्रियकरासाठी काहीही करण्याची तयारी असते. अशीच काहीशी प्रेमकहानी पाकिस्तानातून समोर आली आहे. येथील एक १८ वर्षांची मुलगी चक्क ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात वेडी झाली आहे.

हेही वाचा: महिलेनं 8 महिन्याचं जेवण कुटुंबासाठी एकदाच बनवलं, कारण आहे रंजक

पाकिस्तानमध्ये राहणारी 18 वर्षीय मुस्कान 55 वर्षीय फारूखच्या प्रेमात पडली. यानंतर दोघेही कायमचे एकमेकांचे झाले. मुस्कानच्या गाण्याने प्रभावित झाल्यानंतर तो तिच्या जवळ गेला. तर फारुखच्या बोलण्याच्या स्टाइलने मुस्कान त्याच्यावर फिदा झाल्याचं जोडप्याने एका मुलाखतीत सांगितलं.

एका यूट्यूबरला दिलेल्या मुलाखतीत फारूखने सांगितले की, मुस्कान त्याच्या घराजवळच राहायची. त्याला तिच्या गायनाची खूप आवड होती. अशा परिस्थितीत फारुख मुस्कानच्या घरी जाऊ लागले. हळुहळु मुस्कानच्या मनात फारुखविषयी भावना निर्माण झाल्या. त्यानंतर दोघे एकमेकांशी बोलू लागले.

हेही वाचा: Baby Born Twice : आश्चर्यच! एकाच बाळाला दिला दोनदा जन्म, वाचा काय आहे प्रकरण

फारुखच्या म्हणण्यानुसार, मुस्कान आधी आपल्या प्रेमात पडली होती. मग त्यानेही आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. दोघेही रिलेशनमध्ये येण्याचा विचार करू लागले तेव्हा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी, मित्रांनी, नातेवाईकांनी त्यांना विरोध केला. मात्र, कोणाचीही पर्वा न करता दोघे एक झाले.

मुलाखतीत मुस्कान म्हणते की, फारुख जेव्हा तिच्या घरी यायचा तेव्हा ती 'ना मिलो हमसे ज्यादा कही प्यार हो ना जाये...' गाणे म्हणायची. मुस्कानला फारुखची बोलण्याची पद्धत, शैली, स्वभाव आवडला आणि मग ती फारुखच्या प्रेमात पडला हे नक्की.

हेही वाचा: Khaby Lame : प्रसिद्ध टिकटॉकर खॅबीला अखेर मिळाले इटालियन नागरिकत्व

मुस्कान म्हणते फारुखसाठी मी काहीही करू शकते, अगदी जीवही देऊ शकते. फारुखने देखील मुस्कानबद्दल अशीच भावना व्यक्ती केली आहे. फारुख म्हणतो की, देवाच्या आशीर्वादामुळेच आपल्याला मुस्कानसारखी मुलगी मिळाली. फारुखचे हे पहिले लग्न आहे. आतापर्यंत ते बॅचलर होते, पण वयाच्या ५५ ​​व्या वर्षी त्यांना वधू मिळाली.

Web Title: 18 Year Old Girl Fall In Love With 55 Year Old Man

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pakistanlove story