मी ट्रेलर नाही पिक्चर दाखवतो- राज ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जानेवारी 2017

अनेक योजना काँग्रेसच्या काळात आल्या भाजपने त्या फक्त मांडल्या. काँग्रेसने योजना केली मोदींनी जलपूजन केले त्यात नवल काय. निवडणुकीच्या तोंडावर लोकांना हे सुचत. सध्या जातीचं राजकारण सुरु आहे.

मुंबई - मी ट्रेलर नाही पिक्चर दाखवतो. निवडणुकीत मनसे स्वबळावर लढणार. सेना भाजपकडे पैसे आहेत म्हणून ते दुसऱ्या पक्षातील लोकांना विकत घेतात, माझ्याकडे नाहीत, असा टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोधी पक्षांना लगाविला.

राज ठाकरे यांनी आज (बुधवार) फेसबुकवरील मनसेच्या अधिकृत पेजवरून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आगामी महापालिका निवडणुकीबाबत आणि पक्षातून सुरु असलेल्या आउटगोईंगबाबत भाष्य केले.

राज ठाकरे म्हणाले, ''महापालिका निवडणुकीत युती करणार असल्याची निव्वळ अफवा यावर मी कोणताही बाईट किंवा कोट दिलेला नाही. ज्यांना पक्षातून जायचे आहे त्यांनी पक्षातून जावे. पक्षात अनेक जवळचे लोक आहेत. मी ट्रेलर दाखवत नाही, तर थेट पिक्चर दाखवतो. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढे मी काय करणार ते आताच सांगू शकत नाही. टोल नाके माझ्या पक्षामुळे बंद झाले. राज्याची सत्ता माझ्या हाती देऊन पहा. परप्रांतीयांचा मुद्दा अजून बंद झालेला नाही. आजोबांनी सांगितलंय, संबंध तुटले तरी चालेल पण आपली भूमिका नेहमी ठाम असली पाहिजे.''

ट्विटर मला आवडत नाही. त्यामुळे सोशल नेटवर्किंगचा योग्य तेवढाच वापर करेन, असे राज ठाकरे यांनी सांगितले. अनेक योजना काँग्रेसच्या काळात आल्या भाजपने त्या फक्त मांडल्या. काँग्रेसने योजना केली मोदींनी जलपूजन केले त्यात नवल काय. निवडणुकीच्या तोंडावर लोकांना हे सुचत. सध्या जातीचं राजकारण सुरु आहे. आता सध्या इतिहासाचे संदर्भ घेऊन लिहिणारे कमी आहेत. संभाजीराजे वडिलांशी भांडून मोघलांना मिळाले हे हि तितकाच सत्य आहे. एकही डाग नसलेला माणूस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, असे मत राज यांनी मांडले.

Web Title: MNS president Raj Thackeray talk about municipal corporation elections