राज ठाकरेंनी अशी वाहिली टी. एन. शेषन यांना श्रद्धांजली!

टीम ई-सकाळ
Monday, 11 November 2019

शेषन हे निवडणूक आयुक्त म्हणून त्यांनी यंत्रणेला लावलेल्या शिस्तीमुळे सामान्य जनतेमध्येही लोकप्रिय झाले होते.

नियमांची काटेकोर अंमलबजावणी करीत निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणणारे आणि गैरप्रकार करणाऱ्यांच्या मनात धडकी भरविणारे माजी मुख्य निवडणूक आयुक्त तिरुनेल्लाई नारायणा उर्फ टी. एन. शेषन (वय 87) यांचे रविवारी (ता.11) रात्री 9.30 वाजता चेन्नई येथील घरी हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले. 

''सध्या राज्यात आणि देशातही अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. अशावेळी शेषन यांच्यासारख्या प्रशासकीय अधिकाऱ्याचं जाणं याहून दु:खद काय असू शकतं,'' अशी भावना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरवर व्यक्त केली आहे.  

- थेट अयोध्येतून : आता राममंदिर होणार 72 एकर जागेवर!

- संजय राऊतच का बनलेत शिवसेनेच्या भात्यातील बाण?

टी. एन. शेषन यांचा अल्प परिचय :

शेषन यांचा जन्म 15 डिसेंबर 1932 ला केरळमधील पलक्कड येथे झाला होता. भारतीय प्रशासकीय सेवेच्या 1955 च्या तुकडीचे अधिकारी असलेल्या टी. एन. शेषन यांनी डिसेंबर 1990 ते डिसेंबर 1996 या कालावधीत देशाचे दहावे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम पाहिले. त्यांनी कॅबिनेट सचिव म्हणूनही काम पाहिले होते. निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती होण्याआधी ते योजना आयोगाचे सदस्य होते.

- सातारचा मुख्यमंत्री पुन्हा हाेणार?

शेषन हे निवडणूक आयुक्त म्हणून त्यांनी यंत्रणेला लावलेल्या शिस्तीमुळे सामान्य जनतेमध्येही लोकप्रिय झाले होते. आपल्या कारकिर्दीत त्यांनी निवडणूक प्रक्रियेत सुधारणा केली आणि आयोगाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. सेवेतील त्यांच्या उल्लेखनीय कामाबद्दल 1996 मध्ये त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त झाला होता. भारत सरकारनेही पद्मश्री आणि पद्मविभूषणने सन्मानित केले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS President Raj Thackeray tribute to T N Sheshan