राज ठाकरे पुण्यात घेणार कार्यकर्त्यांची शाळा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 20 December 2019

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मोठे यश पदरी न पडल्याने मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आता आपल्या पक्ष बांधणीला प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. ते दोन दिवस पुण्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

पुणे : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मोठे यश पदरी न पडल्याने मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आता आपल्या पक्ष बांधणीला प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. ते दोन दिवस पुण्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

दरम्यान, नुकत्याच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका झाल्या यामध्ये मनसेला म्हणावे तसे यश मिळाले नाही. या निवडणुकीत मनसेचा फक्त एकच आमदार निवडुण आला आहे. आता पक्षविस्तार करण्यासाठी राज ठाकरे यांनी पाउले उचलली आसल्याचे दिसत आहे.    

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

सध्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. आजपासून संवाद शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. आज शुक्रवार आणि उद्या शनिवार या दिवशी मनसेच्या राज्यातील जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, पदाधिकारी यांचं शिबीर पार पडणार आहे.

देशभरात हिंसाचाराच्या घटना : वाचा दिवसभरात कोठे काय घडले!

दरम्यान, पक्ष बांधणीसह इतर विषयावर राज ठाकरे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. पुण्यातील कात्रज येथे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांचे शिबिर तर शनिवारी सरचिटणीस आणि पदाधिकारी यांची बैठक डेक्कन जिमखाना येथे होणार होणार आहे. या बैठकीमध्ये मोबाईल घेऊन जाण्यास कार्यकर्त्यांना मनाई करण्यात आल्याची माहिती मिळते आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS president Raj Thackeray will hold a class of activists in Pune