Raj Thackrey: 'फक्त एकदा हातात सत्ता आली तर...महाराजांची शपथ घेऊन सांगतो...' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 raj Thackeray

Raj Thackrey: 'फक्त एकदा हातात सत्ता आली तर...महाराजांची शपथ घेऊन सांगतो...'

प्रसिद्ध मराठी अभिनेता सुबोध भावे यांनी 'हर हर महादेव' या चित्रपटाच्या निमित्ताने मनसे प्रमुख राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. यावेळी मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात सुबोध भावे यांनी राज ठाकरेंना एक इंटरेस्टींग प्रश्न विचारला होता. छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन एखाद्या गोष्ट सांगायची असेल तर तुम्ही काय सांगला? असा प्रश्न सुबोध भावे यांनी केला असता मनसेच्या हातात राज्याची सत्ता आली तर काय करुन दाखवणार हे राज ठाकरे यांनी महाराजांची शपथ घेऊन सांगितले आहे.

जर सत्ता माझ्या हातामध्ये आली तर जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र मी लोकांना करून दाखवेन असे राज ठाकरे यांनी महाराजांची शपथ घेऊन सांगितले आहे. माझ्या पक्षाच्या स्थापनेच्या वेळेला पहिल्या सभेत जे मी बोललो होतो मी महाराजांना स्मरण करून खरंच मी शपथपूर्वक सांगतो की, जर ही हे राज्य माझ्या हातामध्ये आलं तर जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र मी लोकांना करून दाखवीन असे राज ठाकरे म्हणाले आहेत.

हेही वाचा: Raj Thackeray: राज यांची मोठी घोषणा, छत्रपती शिवाजी महाराजांवर काढणार चित्रपट

महाराष्ट्रात परिवर्तन घडवणे सहज शक्य आहे. आता नाही पण उद्या, परवा कधी ना कधी हे नक्की घडेल असा विश्वासही यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. पुरुष गरोदर राहणे आणि बाहेर आलेली टूथपेस्ट आत घेणे या दोन गोष्टी सोडल्या तर जगात अशक्य गोष्ट कुठलीही नाही असेही राज ठाकरे म्हणाले आहेत.

हेही वाचा: Raj Thackeray: चित्रपट चांगला की वाईट यानं फरक पडत नाही, पण...राज ठाकरे स्पष्टच बोलले

टॅग्स :Subodh BhaveRaj Thackeray