Raj Thackeray : ...तर, उगाचंच सणासुदीत खळ्ळखट्याक होईल; राज ठाकरेंचं ट्वीट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackeray

Raj Thackeray : ...तर, उगाचंच सणासुदीत खळ्ळखट्याक होईल; राज ठाकरेंचं ट्वीट

Raj Thackeray Tweet On PFI : राष्ट्रीय तपास एजन्सीनं (NIA) पुण्यासह देशभरात पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेवरील छापेमारीविरोधात काल पुण्यात आंदोलन केलं. यावेळी 'पाकिस्तान जिंदाबाद' आणि 'अल्लाह हूं अकबर' अशी घोषणाबाजी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यानंतर राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली असून, यात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ट्वीट करत यात उडी घेच इशारा दिला आहे.

राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?

राज ठाकरेंनी पुण्यातील आंदोलनात देण्यात आलेल्या 'पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर' अशा घोषणांवर भाष्य करत इशारा दिला आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, एनआयएने छापे घातले आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या पदाधिकान्यांना, कार्यकर्त्यांना अटक केली, म्हणून पुण्यात ह्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी, 'पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर' अशा घोषणा दिल्या. सरकारने ह्यांना वेळीच ठेचलं पाहिजे.

ही अटक कशासाठी झाली? तर दहशतवाद्यांना आर्थिक मदत करणे, त्यांची प्रशिक्षण शिविरं आयोजित करणे, ह्या गंभीर आरोपांखाली ... थोडक्यात देशद्रोही कृत्यांसाठी. तरीही ह्या देशद्रोह्यांचं समर्थन करत जर ह्या PFI च्या कार्यकर्त्यांना त्यांचा धर्म आणि पाकिस्तान आठवत असेल, तर तुमचा धर्म घ्या आणि पाकिस्तानात चालते व्हा. ही थेरं आमच्या देशांत चालणार नाहीत.

हेही वाचा: पुण्यात 'पाकिस्तान जिंदाबाद'चे नारे; फडणवीस म्हणाले, घोषणा देणाऱ्यांना...

माझी केंद्रातील आणि राज्यातील गृहमंत्र्यांना विनंती आहे की फक्त ह्या देशद्रोह्यांनाच नव्हे तर त्यांच्या ह्या समर्थकांना पण अशी अद्दल घडवा की यापुढे पाण्यासाठी देखील (पा) उच्चारता येणार नाही. नाहीतर आता ह्या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत. हिंदुस्थानातील हिंदूंच्या आणि महाराष्ट्रातील हिंदू मरहट्ट्यांच्या मुठी जर आवळल्या तर ह्या हरामखोरांना कुठे पाय लावून पळायला लागेल हे मला सांगायला लावू नका. ह्या सगळ्याने उगाचच सणासुदीच्या काळात अशांतता पसरेल. त्यापेक्षा ही कीड समूळ नष्टच करा, ह्यातच हिंदुस्थानाचं हित आहे.

एकनाथ शिंदेंचं ट्वीट

दरम्यान, पुण्यातील या घोषणांनंतर पुण्यासह राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट केले आहे. पुण्यात ज्या समाजकंटकांनी पाकिस्तान झिंदाबादचे नारे दिले त्या प्रवृत्तीचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. पोलीस यंत्रणा त्यांच्याविरोधात योग्य ती कारवाई करेलच, पण शिवरायांच्या भूमीत असले नारे अजिबात सहन केले जाणार नसल्याचे शिंदेंनी म्हटले आहे.