Devendra fadnavis
Devendra fadnavisSakal

पुण्यात 'पाकिस्तान जिंदाबाद'चे नारे; फडणवीस म्हणाले, घोषणा देणाऱ्यांना...

नागपूर : राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) देशभरातील कार्यालयावर छापे टाकल्यानंतर PFIच्या कार्यकर्त्यांनी देशभरातील अनेक ठिकाणी निदर्शने केली. काल पुण्यात पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या निदर्शनावेळी 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा दिल्या होत्या. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

(Devendra Fadnavis On Announcement of Pakistan Zindabad)

"पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना सोडणार नाही, त्याला शोधून त्यावर कारवाई करू" अशा शब्दांत फडणवीसांनी इशारा दिला आहे. तर काल पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर झालेल्या आंदोलनात 'पाकिस्तान जिंदाबाद' आणि 'अल्लाह हूं अकबर' अशी घोषणाबाजी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी ही घोषणाबाजी केली आहे.

Devendra fadnavis
अवघ्या दोन वर्षाचा चिमुकला देतोय 'भारत माझा देश'चे धडे; पाहा Viral Video

दरम्यान, पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं असून या प्रकरणावर पोलिसांनी मौन धारण केलं आहे. तर घोषणाबाजी केलेल्या प्रकारावर पोलिसांनीअजून स्पष्टीकरण दिले नाही. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून भाजपचे आमदार राम सातपुते यांनी हा व्हिडिओ ट्वीट केलाय.

पीएफआय संघटनेकडून देशात अशांतता पसरवण्याचे प्रयत्न केले जात असून त्यांच्याकडे चौकशीदरम्यान अनेक पुरावे सापडले आहेत अशी माहिती फडणवीसांनी दिली आहे. त्याचबरोबर पुणे पोलिसांनी घोषणा देण्याचा प्रकार पुण्यात घडला नसल्याचं सांगितलं आहे. तर भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याचं PFIचं लक्ष्य असल्याचं संबंधित आरोपीच्या चौकशीतून समोर आलं आहे.

Devendra fadnavis
Suraj Pawar : सैराट फेम सूरज पवार चौकशीसाठी पोलीस ठाण्यात दाखल

राष्ट्रीय तपास संस्थेने गुरूवारी देशभरातील PFIच्या कार्यालयावर छापे टाकले. टेरर फंडिंग आणि दहशतवादी कारवायच्या संशयावरून हे छापे टाकण्यात आले असून त्यामध्ये १०० पेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर अनेक खुलासे आरोपींनी चौकशीत केल्याचं समोर आलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com