कोणी गृहीत धरु नये, आमदार राजू पाटलांचं वक्तव्याने वाढवली चुरस

राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मतदान केल्याचंही राजू पाटील यांनी यावेळी सांगितलं.
 raju patil
raju patilsakal
Updated on

मुंबई : विधान परिषदेच्या 10 जागांसाठी आज मतदान सुरू असून, मतदानासाठी आता शवटचा दीड तास उरला आहे. त्यात आता मनसेचे एकमेव उमेदवार राजू पाटील यांच मत नेमकं कुणाला गेले. याबद्दल आता अनेक चर्चा रंगताना दिसू लागल्या आहेत. त्यात राजू पाटील यांनी मतदानानंतर आपले मत कुणी गृहीत धरू नये असे विधान केले आहे. त्यामुळे मनसेच्या एकमेव आमदाराचे मत नेमकं कुणाला गेले याबद्दल आता चर्चा सुरू झाल्या आहेत. मागच्या वेळेस आम्ही व्यक्ती बघून मतदान केले होते. मात्र, यावेळी गृहीत धरून नये असे पाटील म्हणाले. राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मतदान केल्याचंही राजू पाटील यांनी यावेळी सांगितलं.

विधानपरिषदेच्या एकूण 10 जागांसाठी सकाळी 9 वाजल्यापासून मतादानाला सुरुवात झाली असून, 11 उमेदवार रिंगणात आहेत. दुपारी चार वाजेपर्यंत आमदरांना मतदानाचा हक्क बजावता येणार असून, संध्याकाळी 5 वाजता मतमोजणीला सुरूवात होणार आहे.

राज्यसभेतील दगाफटक्यानंतर मविआ सावध

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्यसभेच्या सहा जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात होते. यामध्ये महाविकास आघाडी सरकारला मोठा दगा फटका सहजन करावा लागला होता. त्यानंतर आजच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत मविआचा प्रत्येक नेता सावध झाल्याचे पाहण्यास मिळत असून, 1996 आणि 2010 सारखी विधान परिषदेच्या धक्कादायक निकालाची परंपरा पहायला मिळणार का? याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.

राज ठकरेंच्या आदेशानुसार मतदान

राजू पाटील म्हणाले की, मी काल रात्री राज ठाकरेंना रुग्णालयामध्ये भेटायला गेलो होतो. त्यावेळी राज ठाकरेंनी मला काही निर्देश दिले होते. त्याप्रमाणेच मतदान केले आहे. मागच्या वेळेस आम्ही व्यक्ती बघून मतदान केले होते. मात्र, यावेळी कुणी आम्हाला गृहीत धरून नये असे पाटील म्हणाले. राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मतदान केल्याचंही राजू पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. त्यामुळे राजू पाटील यांचं मत नेमकं कुठल्या पक्षाच्या उमेदवाराला मिळालं याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Farmer Earns Premium Price as Sugarcane Fetches ₹5,000 Per Tonne
solapur city
The Pune Municipal Corporation has approved medical assistance for the families of former corporators under its contributory healthcare scheme.
Students Get Financial Boost as Monthly Hostel Meal Grant Raised to ₹3,200
Marathi News Esakal
www.esakal.com