मनसेच्या राजू पाटलांना मंत्री पद मिळाल्यास दसरा साजरा करू; भाजप नेत्याचे वक्तव्य

प्रलंबित असलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर पार पडला
Mns Raju Patil
Mns Raju Patil esakal

गेल्या महिन्याभरापासून प्रलंबित असलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर पार पडला आहे. राजभवनावर हा शपथविधी पार पडला. पहिल्या टप्प्यात डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांना कॅबिनेट मंत्री पद देण्यात आले. त्यानंतर अनेक नेत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. दरम्यान, भाजप कल्याण जिल्हा उपाध्यक्ष संदीप माळी यांनी आनंद व्यक्त करताना मनसेचे आमदार राजू पाटील यांना मंत्री पद मिळाल्यास दसरा साजरा करू असे वक्तव्य केलं आहे.(Mns Raju Patil May Get Cabinet Portfolio In Shinde Devendra Fadnavis Government )

Mns Raju Patil
देशातील सर्वात श्रीमंत बिल्डर शिंदे मंत्रिमंडळात; जाणून घ्या लोढा यांचं राजकीय महत्व

रवींद्र चव्हाण यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनामध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे. यावेळी भाजप कल्याण जिल्हा उपाध्यक्ष संदीप माळी यांनी प्रतिक्रीया देताना आनंद व्यक्त केला. अडीच वर्षाच्या प्रतिक्षेनंतर आज आम्ही दिवाळी साजरी करणार आहोत अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केला.(Eknath Shinde Cabinet Expansion)

तसेच, यावेळी मनसेचे आमदार राजू पाटील यांच्या मंत्रीपदाविषयी विचारले असता. राजू पाटील हे मित्रापेक्षा आमचे भाऊ आहेत. त्यामुळे राजू पाटलांना मंत्रीपद मिळात तर आम्ही दिवाळी साजरी करु. असे मोठं वक्तव्य संदीप माळी यांनी केलं आहे.

Mns Raju Patil
"संजय राठोडांना मंत्री केल्याचा आनंद" - सुप्रिया सुळे

रवींद्र चव्हाण यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. २००९ पासून ते आमदार आहेत. कल्याण-डोंबिवलीचे नगरसेवक म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यांच्याकडे अनेक खाती सांभाळण्याचा अनुभव आहे.

Mns Raju Patil
डावलण्यात आलेल्या पंकजा मुंडेंचे मंत्रीमंडळ विस्तारानंतर पहिलं ट्विट

दोन दिवसांपूर्वी, राजू पाटील यांनी मंत्रीमंडळ विस्तारावरुन सरकारवर निशाणा साधला होता. "बंड झाले, आता थंड झाले? पालिकेत नगरसेवक नाहीत, जिल्हाला पालकमंत्री नाही, राज्याला मंत्री नाहीत, मंत्रालयाचं पुन्हा सचिवालय झालंय, सर्वकाही ठप्प आहे. तुमचं सर्व ओक्के आहे हो, पण लोकांचे सण आलेत. रस्त्यांवरचे खड्डे, वाहतूक कोंडी, रोगराई वाढत आहे. याकडे कोण बघेल? असा सवालही ट्विटरवर ट्वीट करून राजू पाटील यांनी विचारला होता. सरकारच्या बाजूनं मतदान करणाऱ्या मनसे आमदारांच्या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचवल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com