Supriya Sule : संजय राठोडांना मंत्री केल्याचा आनंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Supriya Sule Sanjay Rathod

"संजय राठोडांना मंत्री केल्याचा आनंद" - सुप्रिया सुळे

मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर रखडलेला मंत्रिमंडळाचा पहिल्या टप्प्यातील विस्तार आज अखेर पार पडला आहे. यामध्ये एकनाश शिंदे गटातील ९ आणि भाजपच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामध्ये पूजा चव्हाण प्रकरणात आरोप असलेले आमदार संजय राठोड यांचाही सामावेश असून त्यांच्या नावावर आता आक्षेप घेतला जात आहे. तर संजय राठोडांना मंत्रिपद दिल्याचा आनंद आहे असं वक्तव्य राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.

(Supriya Sule On Sanjay Rathod)

दरम्यान, "मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या शपथविधीत १८ मंत्र्यांनी शपथ घेतली परंतू यात महिलांना प्रतिनिधीत्त्व देण्यात आले नाही. मंत्रीमंडळात महिलांना योग्य ते प्रतिनिधीत्व मिळेल अशी अपेक्षा होती परंतु एकाही महिलेला संधी मिळाली नाही. हे अतिशय खेदजनक आहे." असं ट्वीट त्यांनी केलं आहे.

त्याचबरोबर पूजा चव्हाण प्रकरणात आरोप असलेल्या संजय राठोडांना मंत्रिपद दिल्याचा आनंद असल्याचं सुप्रिया सुळे यांनी बोलताना सांगितलं आहे. त्यांच्यावर आरोप केले जात असताना आम्ही वारंवार सांगत होतो की त्यांच्यावरील आरोप चुकीचे आहेत. त्यानंतर भाजपमुळेच संजय राठोडांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. पण आता भाजपमुळेच राठोडांना मंत्रिपद मिळालं त्यामुळे मला आनंद होतोय असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

शिंदे गटातील या नेत्यांनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ

तानाजी सावंत (Tanaji Sawant), उदय सामंत (Uday Samant), संदीपान भुमरे (Sandipan Bhumre), दादा भुसे (Dada Bhuse), अब्दुल सत्तार (Abdul Sattar), दीपक केसरकर (Deepak Kesarkar), शंभूराज देसाई (Shambhuraj Desai), संजय राठोड (Sanjay Rathod), गुलाबराव पाटील (Gulabrao Patil)

भाजपमधून या मंत्र्यांनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ

गिरीश महाजन (Girish Mahajan), चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil, सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar), सुरेश खाडे (Suresh Khade), राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil), अतुल सावे (Atul Save), रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan), विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit), मंगलप्रभात लोढा

Web Title: Sanjay Rathod Minister Oath Supriya Sule Reaction Maharashtra Cabinet Expansion

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..