Sanjay Raut: एहसान फरामोश...; राऊतांच्या टीकेला मनसेच उत्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut: एहसान फरामोश...; राऊतांच्या टीकेला मनसेचं उत्तर

Sanjay Raut: एहसान फरामोश...; राऊतांच्या टीकेला मनसेचं उत्तर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून भाजपने अंधेरीची निवडणूक लढवू नये अशी विनंती करत पत्र लिहालं होतं. दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी आमदार झाल्यास रमेश यांच्या आत्म्यास खरोखर शांती मिळेल माझी विनंती आहे की भारतीय जनता पक्षानं ती निवडणूक लढवू नये, अशी विनंती राज ठाकरे यांनी आपल्या पत्रातून केली होती. त्यावर ...

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंच्या पत्रावर टीका केली होती. ते "म्हणाले होते राज ठाकरेंचे पत्र हे स्क्रिप्ट आहे" त्या टीकेला मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी उत्तर दिलं आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटल आहे की "राऊतजी आपणांस सगळेच जण ओळखून आहेत, आपली तीच ओळख चांगली आहे. आजपर्यंत मी तुमच्या कोणत्याच टीकेला उत्तर दिले नाही.

हेही वाचा: Gram Panchayat Result: अखेर गुलाल उधळला! राज्यात भाजपने मारली बाजी

पण आजही तुम्ही राज साहेबांबद्दल गरळ ओकली. तुमच्या जडणघडणीत राज साहेबांची तुम्हाला खुप मोठी मदत झालेली आहे हे तुम्ही विसरले आहात. तुम्हाला जसे ओळखतात तसेच ओळखले जावे, एहसान फरामोश" म्हणून तुमची ओळख होऊ नव्हे हीच सदिच्छा. म्हणून इथून पुढे तरी टिका करताना भान ठेवा" असं म्हणत राऊतांना उत्तर दिलं आहे.

दरम्यान, 10 ऑक्टोबरला राऊतांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली होती. त्यावेळी त्यांच्या कोठडीत सात दिवसांची वाढ करण्यात आली होती. ही मुदत संपल्यानंतर आज त्यांना PMLA कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यानंतर आजही त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे राऊतांना आणखी एक दिवस पुढील निर्णयासाठी वाट पहावी लागणार आहे.

टॅग्स :Sanjay Rautmns