Gram Panchayat Result: अखेर गुलाल उधळला! राज्यात भाजपने मारली बाजी

महाराष्ट्रात पार पडलेल्या विविध ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले
Gram Panchayat Result
Gram Panchayat Resultesakal

Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 : राज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये काल पार पडलेल्या १०७९ ग्रामपंचायतींचे आज निकाल जाहीर झाले आहेत. सरपंचाची निवड थेट जनतेतून असल्याने कोणती ग्रामपंचायत कोणत्या पक्षाच्या ताब्यात गेली, हे स्पष्ट झाले असून, भाजपच्या ताब्यात ३९७ , राष्ट्रवादीच्या ताब्यात ९८ ,शिवसेना ठाकरे गटाच्या ताब्यात ८७, काँग्रेसच्या ताब्यात १०४ , शिंदे गटाच्या ८१ ताब्यात येवढ्या ग्रामपंचायती मिळाल्या आहेत. तर अपक्षांचा देखील बोलबाला पाहिला मिळाला आहे. अपक्षांच्या ताब्यात २०० ग्रामपंचायती आहेत. तर भाजपने बाजी मारल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे.

(GramPanchayat Election Result Live Updates)

रत्नागिरी ग्रामपंचायत निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाची ताकद असल्याचं दिसून आलं आहे. एकूण 24 ग्रामपंचायतींमध्ये उद्धव ठाकरे गटाची सत्ता आली आहे. तर शिंदे गटाला फक्त 7 ग्रांमपंतायतींमध्ये यश आलं आहे. मात्र राष्ट्रवादीला या निवडणूकीत ९८ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. तर राष्ट्रवादीचे नेते नेते प्रफुल पटेल यांना धक्का बसला आहे. गोंदियात राष्ट्रवादीला एकाही ग्रामपंचायतीवर जिंकता आलेलं नाही. त्यामुळे गोंदियात त्यांचा सुपडा साफ झाल्याचं दिसून आलं. पाचपैकी चार ठिकाणी भाजप तर एका ठिकाणी काँग्रेसने यश मिळवलं आहे. 

Gram Panchayat Result
Abhijeet Bichukale: मी सांगेल त्याला आमदार करा; यांचे एकमेकांशी...

शिंदे गटाला मिळालेल्या जागांवरून पुढील चित्र स्पष्ट झालं आहे. राष्ट्रवादी पेक्षा जास्त जागा शिंदे गटाला मिळाल्या आहेत. त्यामुळे या निवडणूकीत राष्ट्रवादीची पिछेहाट झाल्याचे दिसून येतं. तसेच राज्यातील अनेक दिग्जांना देखील धक्का बसला आहे. शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री दिपक केसरकर यांच्या ताब्यात असलेली पाट्ये पुनर्वसन ग्रामपंचायत भाजपकडे गेल्याने यांचा सुफडा साफ झाला आहे. केसरकरांच्या मतदारसंघात शिंदेगटाला एकही ग्रामपंचायत राखता आलेली नाही.  त्यामुळे युती फक्त सरकार पुरतीच आहे. का? असा सवाला लोक विचारू लागले आहेत.

Gram Panchayat Result
Pune : बारावीच्या परीक्षेसाठी नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील एका गावाने धक्कादायक निकाल दिलाय. सर्व मोठ्या पक्षांच्या उमेदवारांनी धूळ चारत अपक्षांना संधी देण्यात आलीय. गावकऱ्यांच्या ह्या अनोख्या एकजुटीची राज्यभर चर्चा होतेय. जावळी तालुक्यातील भणंग ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीचे दोन्ही प्रतिस्पर्धी पॅनलचे सर्व उमेदवार पडले. मतदारांनी सर्वच्या सर्व अपक्ष उमेदवारांना निवडून दिले आहे. त्यामुळे राज्यामध्ये भणंग ग्रामपंचायतचा निकाल लक्षवेधी ठरला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com