'पोस्टरबाजीने मनसे उत्तर देईल, कोणाच्याही इशाऱ्याला घाबरत नाही'

शिवसेना महाआरती करत असेल तर स्वागत - संदीप देशपांडे
Sandeep Deshpande
Sandeep Deshpandee sakal
Updated on
Summary

शिवसेना महाआरती करत असेल तर स्वागत - संदीप देशपांडे

देशात गगनाला भिडलेली महागाई कमी व्हावी, बेरोजगारीच्या समस्येला आळा बसावा, कोरोना महामारी समूळ नष्ट व्हावी यासाठी शिवसेनेकडून आज हनुमानाला साकडे घातले जाणार आहे. दादर पश्चिम येथील न. चिं. केळकर मार्गावरील पुरातन श्री. हनुमान मंदिर येथे सायंकाळी 6 वाजता शिवसेनेने महाआरतीचे आयोजन केले आहे. दरम्यान, आता यावरून आता मनसेचे संदीप देशपांडे यांनी सेनेवर निशाणा साधला आहे.

Sandeep Deshpande
Manipur Election Result : भाजपची जोरदार मुसंडी; राज्यात फुललं 'कमळ'

ते म्हणाले, शिवसेना महाआरती करत असेल तर स्वागत आहे. राज ठाकरे यांच्या इशाऱ्यावर शिवसेना चालत आहे. केवळ महाआरती न करता मशिदीवरील भोंगे कायद्याचे पालन करत वाजवावे याचे यासाठी शिवसेनेने पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले आहेत. आम्ही कोणाच्याही इशाऱ्याला घाबरत नाही. पोस्टरबाजी करत मनसे जश्यास तसे उत्तर देणार आहे. रोहित पवार यांच्या बोलण्याला काहीही अर्थ नाही. मनीषा कायंदे यांनी शिवसेनेवर लक्ष द्यावं, मनसेचं काही करण्यासाठी आम्ही आहोत. आज राज ठाकरे पुण्यात महाआरती करणार असल्याचेही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, दादर पश्चिम येथील न. चिं. केळकर मार्गावर पुरातन वटवृक्ष श्री हनुमान मंदिर आहे. या मंदिराची स्थापना प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुढाकाराने झाली आहे. हनुमान जयंतीनिमित्त या पुरातन मंदिरात आज शनिवारी सायंकाळी 6 ते 7 या वेळेत लोकाग्रहास्तव शिवसेनेने महाआरतीचे आयोजन केले आहे. वाढलेली महागाई, बेरोजगारी कमी व्हावी, कोरोनाचे संकट नष्ट व्हावे म्हणून हनुमानाला साकडे घालण्यात येणार असल्याचे आमदार सदा सरवणकर यांनी स्पष्ट केले आहे.

Sandeep Deshpande
कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक रद्द करा; करुणा शर्मांचा मागणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com