शाळांमध्ये शिक्षकांना आता मोबाईल बंदी! शाळा व्यवस्थापन समिती मोबाईल करणार जप्त

विद्यार्थ्यांना शिकविताना आता शिक्षकांनी मोबाईल वापरू नये, असा नियम जिल्हा परिषदेने केला आहे. स्टाफरूम वगळता अन्य ठिकाणी शाळेच्या वेळेत मोबाईल वापरणाऱ्या शिक्षकांवर आता दंडात्मक कारवाइ होणार आहे.
School
SchoolESAKAL

सोलापूर : विद्यार्थ्यांना शिकविताना आता शिक्षकांनी मोबाईल वापरू नये, असा नियम जिल्हा परिषदेने केला आहे. स्टाफरूम वगळता अन्य ठिकाणी शाळेच्या वेळेत मोबाईल वापरणाऱ्या शिक्षकांवर आता दंडात्मक कारवाइ होणार आहे. शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून दंडाची रक्कम निश्चित केली जाणार आहे.

School
'जळफळाट, थयथयाटाचं कारण...', चित्रा वाघ यांची राऊतांवर टीका

जिल्हा परिषदेचे तत्कालीन उपाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी शिक्षकांना गणवेशाची सक्ती केली होती. पण, काही महिन्यांनी तो नियम राहिला नाही. शिक्षकांना मुख्यालयात राहण्याचे ग्रामविकास व शालेय शिक्षण विभागाने अनेकदा आदेश काढूनही बहुतेक शिक्षक नुसते प्रमाणपत्र सादर करतात, प्रत्यक्षात ते शहराच्या ठिकाणी राहतात, असे निदर्शनास आले. त्यामुळे आता जूनपासून शिक्षकांनी सादर केलेल्या प्रमाणपत्रांची पडताळणी होणार आहे. दुसरीकडे, नवीन शैक्षणिक वर्षापासून शिक्षकांना शाळेत मोबाईल घेऊन जाता येइल, पण अध्यापन करताना किंवा व्हरांड्यात त्यांना मोबाईल वापरता येणार नाही. तसेच शाळेच्या वेळेत शैक्षणिक कामाव्यतिरिक्त त्यांना शाळा सोडून जाता येणार नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटीत तसा प्रकार आढळल्यास मुख्याध्यापकांवरही कारवाई होणार आहे. शिक्षकांच्या वर्तनाचे लहान मुले अनुकरण करतात, त्यामुळे जून २०२२ पासून (नवीन शैक्षणिक वर्ष) या नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे.

School
सोमय्यांकडं किती लक्ष द्यायचं हे ठरवण्याची वेळ आलीय : शंभूराज देसाई

जूनपासून शिक्षकांना ते ज्या ठिकाणी काम करतात तेथील मुख्यालयात राहणे बंधनकारक असेल. दुसरीकडे, शिक्षकांनी मुलांना शिकविताना तथा स्टाफरूमबाहेर असताना मोबाल वापरू नये, जेणेकरून मुलांवर विपरीत परिणाम होइल, असे वर्तन नको. सूचनांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाइ केली जाणार आहे.
- दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

School
उपचारांनंतर अनिल देखमुख यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

कारवाचे असे असणार स्वरूप...
- शाळा व्यवस्थापन समिती ठरवेल दंडाची रक्कम
- पहिल्यांदा नियम मोडल्यास १०० रुपयांचा द्यावा लागणार दंड
- दुसऱ्यांदा नियम मोडल्यास होणार २०० रुपयांचा दंड
- दोनवेळा दंडात्मक कारवाई होऊनही मोबाईल वापरल्यास जप्त होणार मोबाईल

School
दुधाला देखील हमीभाव द्यावा: राजू शेट्टी

शिक्षकांना यासाठी केला नियम
- विद्यार्थ्यांना शिकविताना फोन आल्यास अध्यापनात येऊ शकतो व्यत्यय
- वर्गात मुले असताना मोबाईलवर बोलणाऱ्या शिक्षकांमुळे मुलांच्या मनावर होऊ शकतो विपरीत परिणाम
- शिक्षक मोबाईल वापरतात म्हणून मुलेही आणू शकतात वर्गात मोबाईल
- गुणवत्तावाढीचा प्रयत्न करताना व्यत्यय नकोच; शिक्षकांनी पर्समध्ये तथा स्टाफरूममध्ये ठेवावा मोबाईल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com