मोबाईलला रेंजच येत नसल्यामुळे तो जातोय चक्क... 

mobile-tower.
mobile-tower.
Updated on

पुणे : पुढच्या महिन्यात ऑनलाइन अभ्यासक्रम सुरु होणार आहे. त्यासाठी मोबाईलमध्ये ॲप डाऊनलोड करण्यासाठी सांगितले आहे. ते ॲप मोबाईलमध्ये घ्याचे आहे पण नेटवर्कच येईना. कॉलमध्ये जॉईन होईचे असले तरी पाच किलोमीटरवर चालत जात आहे. जिथे नेटवर्क येईल तिथे थांबूनच जॉईन होत असल्याचे सोलापूर जिल्ह्यातील एका विद्यार्थ्यांने सांगितले.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार अनेक उपाययोजना करत आहे. आता शैक्षणिक वर्ष सुरु करण्यासाठी कोरोना संकटाचा विचार करता महाविद्यालयात सर्व विद्यार्थी येऊ शकणार नाहीत. यासाठी विद्यापीठातील शिक्षकांनी ऑगस्टमध्ये ऑनलाइन अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वयंम, गुगलमीट, क्लासरुम, मीट आणि झूम हे अँप मोबाइलमध्ये डाउनलोड करण्यास सांगितले आहे. आता ऑनलाइन वर्ग सुरु होणार असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर 'सकाळ'ने ग्रामीण भागात पाहणी केली आहे. यात भयान वास्तव समोर आले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील पापरी येथील अभिजीत पाटील म्हणाला, आमच्या घरात मोबाईलला नेटवर्क येत नाही. त्यामुळे सुरुवातीपासून उपस्थितच राहता आले नाही. घरापासून शेत दूर आहे. मग तिकडे जातो. किंवा टॉवर असल्याच्या दिशेने पाच किलोमीटरवर जातो. जिथे नेटवर्क मिळेल तिथे थांबतो. कधी वर्गातील मित्रांकडून माहिती घेतो.

सध्या लहानापासून मोठ्यांपर्यत प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहेत. मोबाईलशिवाय अनेकांचं पानही हालत नाही. सकाळपासून रात्री झोपेपर्यंत मोबाईल हाताळण्याची सर्वांना सवय झाली आहे. मात्र, अनेकांना मोबाईलच्या नेटवर्कमुळे त्रासाला सामोरं जावं लागतं आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानात प्रगती साधली असली तरी आजही ग्रामीण भागातील वस्तीत विकसित व अद्ययावत तंत्रज्ञान पोहोचले नसल्याची परिस्थिती दिसून येत आहे. 4जी सेवा असतानाही मोबाईलला 2जी किंवा 3जी यांना इतकी नेटवर्क मिळत आहे. सध्या सर्वत्रच अनेक नामांकित कंपन्यांच्या मोबाईल सेवा कार्यरत आहे, मात्र यापैकी अपवाद वगळता बहुतेक कंपन्यांच्या सेवेचा पूर्ण फज्जा उडाला गेला आहे. सध्या मोबाईल नेटवर्क समस्येने गंभीर रूप धारण केले आहे. काही गावातच मोबाईलला रेंज नाही, तर इंटरनेट तर खूप लांबची गोष्ट आहे. मोबाईलची नेटवर्क नसल्याने इंटरनेट चालत नाही. अशीच परिस्थिती अनेक ठिकाणी आहे. यावेळी काही विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला असता अनेक समस्यांचा त्यांनी पाढा वाचला.

सौंदणी येथील नागनाथ सुरवसे म्हणाले, आमच्या गावात काही सीमला नेटवर्क आहे. पण काही सीमला येत नाही.

पंढरपूर येथील गणेश गायकवाड म्हणाला, आमच्या गावात सर्व कार्डला रेंज आहे. कधीतरच अडचण येते. पण ऑनलाईन शिक्षण घेण्याची मानसिकता पाहिजे. ऑनलाईन शिक्षण हे तात्पुरतेच योग्य आहे. लाईफ टाईम ऑनलाईन शिक्षण असेल तर काहीच समजणार नाही.

 महूद येथील अमोल महारनवर म्हणाले, आमच्या गावात मोबाईलला 2जी किंवा 3जी नेटवर्क मिळत आहे. ठाणे येथील सुनिल भांगे म्हणाले, आमच्या येथे काही सीमला नेटवर्क मिळत नाही. ऑनलाइन शिक्षणासाठी नेटवर्कच्या अडचणीमुळे वायफाय घेतले आहे. 

सोलापूर येथील गुरुनाथ ताटे म्हणाले, मी नेटवर्कमुऊे सीम कन्व्हर्ट करून घेतले. घरातील काही भागात रेंज येत नाही. ऑनलाईन लेक्चरला हाय स्पीड लागते. अशा अनेक अडचणी येत आहेत. 

वैराग येथील भैरव भुसारे म्हणाले, आमच्या गावात नेटवर्कच्या अडचणी आहेत. 
केवड येथील सागर धर्मे म्हणाले, आमच्या गावात काही सीमला नेटवर्क आहे. नेटवर्क शोधत कधी कधी गच्चीवर, बाहेर जावावे लागते. सुरवातीला ऑनलाइन वर्गात उपस्थित राहिलो पण रेंज नसल्यमुळे फोन कट होत होता. त्यामुळे आता कधीही फोनवर उपस्थित राहता येत नाही आहे. 

धोत्री येथील नागनाथ गुरव म्हणाले, आमच्या गावात अनेक कार्डला रेंज आहे, परंतु लाईट गेल्यावर सर्वच कार्डची रेंज बंद पडते. काहीच रेंज येत नाही. 

सोलापूर येथील सानिका गाडे  म्हणाल्या की, माझ्याकडे जिओ आणि एअरटेलचे कार्ड आहे. या भागात रेंज आहे, परंतु कधी कधी जिओ कार्डला रेंज जाते. 

सोलापूर येथील श्रावणी सलगर म्हणाल्या, माझ्याकडे नेटवर्क आहे. परंतु कधीकधी नेटवर्क जाते. त्यामुळे अडचणी निर्माण होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com