मध्य महाराष्ट्र-मराठवाड्यात  आज पावसाची शक्‍यता 

मध्य महाराष्ट्र-मराठवाड्यात  आज  पावसाची शक्‍यता 

पुणे -  कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी; तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत शुक्रवारी (ता. 18) विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे. दक्षिण कोकणात सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्‍यताही व्यक्त करण्यात आली आहे. 

मॉन्सून देशातून परतल्यानंतर मालदीवच्या परिसरात चक्रवाताची, अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राची स्थिती तयार झाली आहे. यामुळे पुढील दोन ते तीन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. विदर्भात हवामान अंशतः ढगाळ राहणार असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

देशातून मॉन्सून परतल्याने राज्यातील अनेक भागांत उन्हाचा चटका वाढला आहे. त्यामुळे कमाल तापमानात चढउतार होत आहे. राज्यातील अनेक भागांत सरासरीच्या तुलनेत कमाल व किमान तापमानात चढउतार झाले आहेत. ऑक्‍टोबर हिटमुळे कोकणातील अनेक भागांत उन्हाचा पारा वाढला आहे. त्यामुळे पुढील तीन ते चार दिवस राज्याच्या वेगवेगळ्या भागांत पाऊस पडेल, असे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. 

पुण्यात मध्यम ते हलक्‍या सरींची शक्‍यता 
पुणे शहर आणि परिसरात पुढील तीन ते चार दिवसांमध्ये हलक्‍या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. त्यामुळे सध्या वाढलेला ऑक्‍टोबर हिटचा चटका कमी होईल. शहरात 31 अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेले कमाल तापमान 30 अंश सेल्सिअसपर्यंत कमी होणार असल्याचे सांगण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com